मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Office Behavior Tips: ऑफिसमध्ये लवकर प्रमोशन मिळवायचं? मग ऑफिसमध्ये चुकूनही करू नका 'ही' कामं

Office Behavior Tips: ऑफिसमध्ये लवकर प्रमोशन मिळवायचं? मग ऑफिसमध्ये चुकूनही करू नका 'ही' कामं

जाणून घ्या काही वाईट सवयी

जाणून घ्या काही वाईट सवयी

आज आम्ही तुम्हला अशाच काही कामांबद्दल सांगणार आहोत ज्यांचं पालन करून तुम्ही लवकरात लवकर प्रमोशन मिळवू शकता.

मुंबई, 22 नोव्हेंबर: करिअरमध्ये पुढे (Career growth Tips) जात राहण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. तुमची वागणूक किंवा तुमची एखादी चूक तुमच्या करिअरसाठी (Mistakes to avoid for better career) महागात पडू शकते. अनेक वेळा आपण आपल्या ऑफिसमधील वागणुकीकडे (Office behavior) लक्ष देत नाही आणि ऑफिसमध्ये काही चुका करतो. मात्र आता चिंता करू नका. जर तुम्हाला करिअरमध्ये नेहमीच प्रमोशन (How to get quick promotion in career) हवं असेल तर तुम्ही ऑफिसमधील वागणुकीकडे नेहमीच लक्ष दिलं पाहिजे आणि काही चुका टाळल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हला अशाच काही कामांबद्दल सांगणार आहोत ज्यांचं पालन करून तुम्ही लवकरात लवकर प्रमोशन मिळवू शकता.

आपल्या इमेजला जपा

तुम्ही कोणत्याही जॉब सेक्टरमध्ये असाल, कोणत्याही कंपनीत काम करत असाल, तुम्ही नेहमी तुमची इमेज जपली पाहिजे. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा कधीही नकारात्मक होऊ देऊ नका.

वेळेचं पालन करा

जर तुम्ही दररोज उशिरा कार्यालयात पोहोचलात तर ते तुमच्या करिअरला नुकसान पोहोचवू शकते. तुमच्या या सवयीमुळे बॉस तुम्हाला कोणतीही जबाबदारी देण्यास टाळाटाळ करतील. तुम्हाला कोणत्याही कारणास्तव उशीर झाला असल्यास, तुमच्या रिपोर्टिंग मॅनेजरला तुम्हाला उशीर का झाला याचे नेमके कारण सांगा.

Interview Tips: Online Interview देताना 'या' गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष

ऑफिसमध्ये फ्लर्ट टाळा

ऑफिसमध्ये लोकांसोबत मस्करी करणे ही चांगली गोष्ट आहे, पण काम करण्याऐवजी सहकाऱ्यांशी फ्लर्ट करत राहिल्यास ही सवय नुकसानास कारणीभूत ठरू शकते. ऑफिसमध्ये चेष्टा-मस्करी करा, पण याचा तुमच्या कामावर किंवा इतरांच्या कामावर परिणाम होणार नाही हेही लक्षात ठेवा.

फोनचा वापर कमी करा

ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्ही फोनवर किंवा सोशल मीडियावर बराच वेळ व्यस्त असाल तर ते करिअरच्या दृष्टीने चांगले नाही. तुमची ही सवय लवकरात लवकर बदला.

शिफ्ट दरम्यान बाहेर पडू नका

तुम्ही तुमच्या शिफ्ट दरम्यान ऑफिसचे काम सोडून सतत ऑफिसच्या बाहेर असाल तर त्याचा तुमच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही कामासाठी बाहेरगावी जावे लागले तर वरिष्ठांची परवानगी घ्या किंवा त्यांना सांगून जा.

First published:
top videos

    Tags: Career