जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Exam Tips: फक्त पोपटपंची करून टॉपर होता येणार नाही; असा अभ्यास कराल नक्कीच व्हाल यशस्वी

Exam Tips: फक्त पोपटपंची करून टॉपर होता येणार नाही; असा अभ्यास कराल नक्कीच व्हाल यशस्वी

नक्कीच व्हाल यशस्वी

नक्कीच व्हाल यशस्वी

आज आम्ही तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही हसत खेळत अभ्यास करू शकाल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर: बोर्डाच्या परीक्षा जवळ येऊ लागल्यामुळे सर्वच विद्यार्थी तयारीला लागले आहेत. परीक्षा आणि अभ्यास म्हंटलं की विद्यार्थ्यांना अक्षरशः धडकी भरते. अभ्यास नक्की कसा आणि कुठून सुरु करायचा या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना भीती वाटते. वर्षभरात शिकवण्यात आलेलं आपल्याला लक्षात राहील ना आणि परीक्षेत ते नीट लिहू शकू ना याची चिंता विद्यार्थ्यांना असते. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही हसत खेळत अभ्यास करू शकाल. तसंच बोर्डाच्या परीक्षांमध्ये चांगले मार्क्सही मिळवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. नियोजन काटेकोरपणे पाळा परीक्षेच्या तयारीमध्ये दिनचर्या नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःसाठी बनवलेल्या अभ्यासाच्या नियमाचे काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पालन करा. असे बरेच विद्यार्थी आहेत जे नियमित योजना बनवतात, परंतु त्याचे पूर्णपणे पालन करत नाहीत. यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहतो आणि परीक्षेच्या शेवटी परीक्षेच्या तयारीचा दबाव वाढतो. त्यांना अभ्यासक्रमाची उजळणीही करता येत नाही. म्हणूनच नियोजन आणि त्याची अंमलबजावणी अतिशय महत्त्वाची आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांना लागणार लॉटरी; IIT मुंबईत तब्बल 50,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज मॉडेल पेपर्स करतील मदत परीक्षेच्या सरावासाठी मॉडेल पेपर सोडवा. हे वेळोवेळी करणे म्हणजे आपली तयारी अधिक धारदार बनविण्यासारखे आहे. हे संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल. तसेच परीक्षेत कोणते प्रश्न वर्णावर विचारले जातात त्यावर तुम्हाला लक्ष देता येईल. भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; तब्बल 341 जागांसाठी होणार बंपर पदभरती नोट्स काढणं आवश्यक परीक्षेच्या तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, अभ्यास करताना नोट्स बनवत राहा. संकल्पनेची समज वाढवण्यासाठी माईंड मॅप्सची मदत घेता येईल. या वेळी काढलेल्या नोट्स रिव्हिजन करताना तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. ना कुठली परीक्षा ना टेस्ट; पुण्यात या मल्टिनॅशनल बँकेचं ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; लगेच करा ऑनलाईन अप्लाय उत्तरं लिहिण्याची प्रॅक्टिस करा यावेलो बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन होणार आहेत. त्यामुळे परीक्षा वेळेत पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखनाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू करताच उत्तर लिहिण्याचा सराव सुरू केला पाहिजे. हे तुम्हाला वेळ आणि परीक्षेचा दबाव कसा मॅनेज करायचा हे समजण्यास मदत करेल. यामुळे पेपर लवकर सोडवता येईल आणि तपासता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात