मुंबई, 24 डिसेंबर: भारतीय लष्करात नोकरी करून देशसेवा करावी, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. लष्करात वेगवेगळ्या पदांवर भरती होत असते. या भरतीची अनेक जण वाट पाहत असतात. आता अशा तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आलीय. केंद्रीय लोकसेवा आयोगाने एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी) आणि सीडीएसमध्ये (नेव्हल अकादमी) 341 रिक्त जागांवर भरती करण्याचं जाहीर केलं आहे. ‘दैनिक भास्कर’ने याबाबतचं वृत्त दिलंय.
12वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार upsc.gov.in या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 10 जानेवारी 2023 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ‘एनडीए’ व ‘सीडीएस’मध्ये भरल्या जाणाऱ्या या 341 पदांमध्ये चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधली 170 पदं, डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीतली 100, इंडियन नेव्हल अकादमी एझिमाला-पाठ्यक्रम 22, एअर फोर्स अकादमी हैदराबाद इथली 32 पदं आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई (मद्रास) इथल्या 17 पदांचा समावेश आहे.
ना कुठली परीक्षा ना टेस्ट; पुण्यात या मल्टिनॅशनल बँकेचं ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; लगेच करा ऑनलाईन अप्लाय
पुढील वर्षी एप्रिलमध्ये परीक्षा
यूपीएससीच्या वतीनं ‘एनडीए’, ‘एनए’ आणि ‘सीडीएस’मध्ये होणाऱ्या 341 पदांच्या भरतीसाठी 16 एप्रिल 2023 रोजी एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येईल. लेखी परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
341 पदांसाठी भरती प्रक्रियेत निवड झाल्यावर उमेदवारांना दरमहा 56,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. यासोबतच त्यांना पदानुसार भत्ते आणि सुविधाही मिळतील.
ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत
परीक्षेसाठी अर्ज कोणाला करता येईल?
- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे.
- ‘सीडीएस’ अर्थात नेव्हल अकादमीसाठी अर्ज करणार्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक आहे.
- एअर-फोर्स अकादमीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- ओपन आणि ओबीसी श्रेणीतल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 200 रुपये शुल्क भरावं लागेल.
- एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतंही शुल्क भरण्याची गरज नाही.
सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती
असा करा अर्ज
- प्रथम upsc.gov.in या यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइटच्या होम पेजवर Recruitment वर क्लिक करा.
- अर्ज करण्यास सुरुवात झाल्यानंतर UPSC Combined Defence Services Examination (I), 2023 ची लिंक ॲक्टिव्ह होईल.
- त्यानंतर Apply Online वर क्लिक करा.
- पुढच्या पेजवर मागितलेला तपशील भरून नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज भरू शकतात.
- अर्ज केल्यानंतर प्रिंट काढा.
लष्करात सहभागी होऊन देशसेवा करण्याची इच्छा असेल तर अर्ज भरून या भरतीत सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी तुम्ही upsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Indian army, Job alert