मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कर्मचाऱ्यांवर कंपनी झाली उदार! विमानाच्या तिकिटापासून सर्व खर्च उचलणार कंपनी; रक्कम बघून तुम्हीही व्हाल थक्क

कर्मचाऱ्यांवर कंपनी झाली उदार! विमानाच्या तिकिटापासून सर्व खर्च उचलणार कंपनी; रक्कम बघून तुम्हीही व्हाल थक्क

कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची अक्षरशः लॉटरी लागली आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची अक्षरशः लॉटरी लागली आहे.

एक दोन नव्हे ही कंपनी कर्मचाऱ्यांवर तब्बल 5 कोटी रुपये खर्च करणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

हॉंगकॉंग, 29 नोव्हेंबर: जगभरातील मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष सोयी सुविधा पुरवत असतात. अगदी जेवणाच्या खर्चापासून तर कुटुंबासह फिरायला जाण्याच्या खर्चापर्यंत कंपन्या कर्मचाऱ्यांना सोयी पुरवत असतात. मात्र हॉंगकॉंगमधील एका कंपनीनं (Black sheep company in HongKong) आपल्या कर्मचाऱ्यांना ज्या सोयी-सोविधा (facilities to employees of company) पुरवण्याचा निर्णय घेतला आहे ते बघून तुम्हीही थक्क व्हाल. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची अक्षरशः लॉटरी लागली आहे. एक दोन नव्हे ही कंपनी कर्मचाऱ्यांवर तब्बल 5 कोटी रुपये खर्च करणार आहे. 'आजतक'नं या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे.

कोरोनामुळे अनेक महिने घरी न गेलेल्या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय ब्लॅकशीप (Blacksheep Restaurant Hongkong) नावाच्या कंपनीनं घेतला आहे. ब्लॅक शिप नावाच्या एका रेस्टोरेंट समूहानं हा निर्णय घेतला आहे. लवकरच ही कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी त्यांच्या घरी पाठवणार (Blacksheep Restaurant gave offer facilities to employees) आहे अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

फ्लाइटपासून ते कोविड चाचणीपर्यंत सर्व गोष्टींची जबाबदारी कंपनी घेईल. कर्मचाऱ्यांना जास्त सुट्या घ्याव्या लागल्या तरी त्यांचे पैसेही मिळणार आहेत. पगारातून कोणतीही कपात केली जाणार नाही. आणि कर्मचारी परतल्यावरही त्यांचा संपूर्ण प्रवास, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च कंपनी उचलणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या ऑफर्स लॉटरीपेक्षा कमी नसणार आहेत.

या रेस्टॉरंटमध्ये 250 हून अधिक कर्मचारी आहेत जे कंपनीने हाँगकाँगपासून भारत, इंग्लंड, नेपाळ तसेच अर्जेंटिना, नायजेरिया, फ्रान्स यांसारख्या शेजारील देशांमध्ये काम करतात..खरं म्हणजे हे कर्मचारी आपल्या कुटुंबाला मागच्या काही महिन्यांपासून भेटू शकले नव्हते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह वेळ मिळावा म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी एक अट असणार आहे.

नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने असं काही केलं, की तीन तासांमध्ये आल्या अनेक ऑफर्स

ज्या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण खर्च कंपनीकडून केल्या जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर पुढील एक वर्ष जॉब सोडता येणार नाही. असं असेल तरी हे कर्मचायांसाठी फायद्याचं डील असणार आहे.

दारूच्या नशेत घेतला निर्णय

सह-संस्थापक सैयद असीम हुसैन आणि क्रिस्टोफर मार्क या दोघांनी हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. खरं म्हणजे दारूच्या नशेत हा निर्णय घेतला आहे. "जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही मद्यपान करत होतो. असं जरी असेल तरी आम्हाला हा निर्णय योग्य वाटतो. जेव्हा आम्ही आमच्या बिझिनेस पार्टनर्सला हा निर्णय सांगितला तेव्हा आम्हला त्यांनी विरोध केला. मात्र त्यानंतर त्यांनी सहमती दर्शवली. कंपनीच्या म्हणायनानुसार, कंपनी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून घरी पाठवण्यास सुरुवात करणार आहे.

संदीप मुलाला भेटण्यास उत्सुक

याच कंपनीतील भारतीय कर्मचारी आणि मूळचे पंजाबमधील रहिवासी संदीप अरोडा यांनी 'आजतक' शी बोलताना सांगितलं की ते दार सहा महिन्याला घरी जात असत मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ते आपल्या कुटुंबाला भेटू शकले नाहीत. त्यांचा मुलगा आठ वर्षांचा आहे आणि तो त्यांना विचारत असतो. मात्र आता ते आनंदी आहेत आणि आपल्या कुटुंबाला भेटण्यास उत्सुक आहेत.

First published:

Tags: Career, Hong kong, Restaurant, World news