मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

टेस्ट घेतली, नोकरीही दिली; नंतर 'तुम्ही पात्र नाहीत' म्हणून ऑफर लेटर देण्यास नकार; बेरोजगारांची चेष्टा

टेस्ट घेतली, नोकरीही दिली; नंतर 'तुम्ही पात्र नाहीत' म्हणून ऑफर लेटर देण्यास नकार; बेरोजगारांची चेष्टा

नक्की कारण काय?

नक्की कारण काय?

विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या आयटीतील नामांकित कंपन्यांमध्ये झालंय. फ्रेशर्सना ‘ऑफर लेटर’ देऊन त्यांना नोकरीत रूजू होण्याच्या आधीच तुम्ही या नोकरीसाठी योग्य नसल्याचं सांगितलं गेलंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 ऑक्टोबर: भारतात सध्या बेरोजगारीचा मुद्दा खूप महत्त्वाचा बनला आहे. उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्यानं बरेच जण त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. नोकरीची संधी मिळावी म्हणून बेरोजगार तरुण त्यांच्या परीने आटोकाट प्रयत्न करत असतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तर परीक्षा, मुलाखती घेऊन विविध कसोट्यांवर उमेदवारांची पडताळणी करत त्यांना नोकरी दिली जाते; पण कंपनीने ऑफर लेटर दिल्यानंतर योग्य उमेदवार नसल्याचा ठपका ठेवला तर हा तरुणांसाठी मोठा धक्का मानावा लागेल. असंच काहीसं विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या आयटीतील नामांकित कंपन्यांमध्ये झालंय. फ्रेशर्सना ‘ऑफर लेटर’ देऊन त्यांना नोकरीत रूजू होण्याच्या आधीच तुम्ही या नोकरीसाठी योग्य नसल्याचं सांगितलं गेलंय. ‘टीव्ही नाईन हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणाला त्याचा ड्रीम जॉब मिळावा असं नेहमी वाटत असतं. त्यामुळे तो मल्टिनॅशनल म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करतो. असचं काही इंजिनीअर्स आणि टेक्निकल विषयांतील पदवीधरांनी विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा अशा बड्या आयटी कंपन्यांत नोकरीसाठी अर्ज केले होते. या तरुणांचा सीव्ही मंजूर करून नोकरी देण्याच्या दृष्टीनं त्यांची परीक्षा घेतली गेली. त्यात उतीर्ण झाल्यानंतर कंपनीनं त्यांची मुलाखतही घेतली. यात पास झाल्यावर जवळपास 3 ते 4 महिन्यांनी त्यांची निवड झाल्याचं कळवण्यात आलं आणि त्यांना ऑफर लेटर दिलं गेलं. पण अचानक नोकरीसाठी आपण पात्र नाहीत, असं म्हणत कंपनीनं ऑफर लेटर परत घेतल्याचं समोर आलंय.

MPSC Recruitment: सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; MPSC तर्फे 378 जागांसाठी भरतीची घोषणा

अनुभवाचा अभाव असल्यानं नाकारलं ऑफर देणं

रिपोर्टनुसार, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा या कंपन्यांनी अनेक उमेदवारांची नोकरीसाठी निवड तर केली, पण कंपनी जॉइन करण्याच्या आधी त्यांना थांबवण्यात आलंय. यात बहुतांश फ्रेशर्स आहेत. उमेदवारांनी शिक्षण पूर्ण होताच नोकरीसाठी अर्ज केले, परंतु या क्षेत्रातील अत्यंत कमी अनुभव असल्यानं त्यांना नोकरी नाकारण्यात आल्याचं सांगितलं गेलं. वास्तविक पाहता काही महिने अनेकदा मुलाखती घेतल्या गेल्या आणि त्यानंतर नोकरीसाठीचं जॉब लेटर दिलं गेलं. त्यानंतर नोकरीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण करत नसल्याचं कारण देत ऑफर लेटर नाकारल्याचं स्पष्टीकरण कंपन्यांनी दिलंय.

तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदं; हवामान विभागात नोकरीची संधी सोडू नका; ही घ्या लिंक

मंदीच सावट असल्याची भीती व्यक्त

नामांकित आयटी कंपन्यांनी ऑफर लेटर नाकारल्यानं आता चर्चेला उधाण आलं आहे. जगभरात आयटी इंडस्ट्रीवर मंदीचं सावट आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपलसारख्या मोठ्या कंपन्यांनी नोकरी देणं थांबवलंय. अनेक कंपन्यांनी तर मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे. पुढील वर्षभरात कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचं आमचं नियोजन असल्याचं फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याआधीच स्पष्ट केलंय. पण अद्यापपर्यंत कुठल्याही कंपनी किंवा संस्थेनं औपचारिकरित्या मंदीबद्दल काही विधान केलेलं नाही. परंतु जगभरातील आयटी कंपन्यांनी नोकरभरती थांबवल्यानं मंदीची स्थिती उद्भवण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

First published:

Tags: Career, Career in danger, Job, Jobs Exams