मुंबई, 24 जून : राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान आज ठाकरे सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. (Big announcement of Thackeray government )
शैक्षणिक वर्ष 2021-22 या कालावधीत शासकीय व शासन अनुदानिक स्वायत्त संस्थांमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात 16 हजार 250 रुपये म्हणजे अंदाजे 25 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत घोषणा केली आहे.
हे ही वाचा:त्या' कारवाईमुळे मुंबई पालिका मालामाल, तिजोरीत भरगच्च रक्कम
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट माटुंग येथे राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संस्थाचा आढावा घेण्यात आला होता. यावेळी ही घोषणा करण्यात आली.
यावेळी उदय सामंत म्हणाले की, शासकीय, शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क शिवाय इतर शुल्क भरावे लागते. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार इतर शुल्कातील 16 हजार 250 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 20 हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा याचा फायदा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.