मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरु करा 'हे' जबरदस्त ऑनलाईन कोर्सेस; दिवाळीपर्यंत मिळेल चांगली नोकरी

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरु करा 'हे' जबरदस्त ऑनलाईन कोर्सेस; दिवाळीपर्यंत मिळेल चांगली नोकरी

आज आम्ही तुम्हाला असे काही कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही दसऱ्याला सुरु कराल तर तुम्हाला दिवाळीपर्यंत जॉब मिळू शकेल. अर्थात यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.

आज आम्ही तुम्हाला असे काही कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही दसऱ्याला सुरु कराल तर तुम्हाला दिवाळीपर्यंत जॉब मिळू शकेल. अर्थात यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.

आज आम्ही तुम्हाला असे काही कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही दसऱ्याला सुरु कराल तर तुम्हाला दिवाळीपर्यंत जॉब मिळू शकेल. अर्थात यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 ऑक्टोबर: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना लेगच पैसे कमवण्याची इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघ्याची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागची एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस करून नोकरी करू शकता. अर्थात नोकरीत समोर जाण्यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण महत्त्वाचं असेल मात्र जर तुम्हाला नोकरीची गरज असेल तर हे शॉर्ट टर्म कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोकरी मिळू शकेल. आज आम्ही तुम्हाला असे काही कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही दसऱ्याला सुरु कराल तर तुम्हाला दिवाळीपर्यंत जॉब मिळू शकेल. अर्थात यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. चला तर जाणून घेऊया या कोर्सेसबद्दल.

डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्पादनांचे विपणन किंवा जाहिरात. एक चांगला डिजिटल मार्केटर होण्यासाठी, तुम्हाला एसइओ, डेटा अॅनालिटिक्स, कंटेंट मार्केटिंग आणि वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्यास मदत करणारी आणि कमाई करण्यात मदत करणारी इतर कौशल्ये समजली पाहिजेत. तुम्ही हे कौशल्य विविध ऑनलाइन कोर्सेसद्वारे विकसित करू शकता आणि त्यामध्ये प्रमाणपत्रे देखील करू शकता

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)

बर्‍याच कंपन्या डिजिटल होत असल्याने, त्यापैकी बर्‍याच कंपन्या डिजिटल मार्केटिंगची गरज ओळखत आहेत. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे (Career in SEO) सखोल ज्ञान असलेल्या लोकांसाठी नोकरीच्या संधींमध्ये सतत वाढ होत आहे. SEO वेबवर कंपनीची दृश्यमानता सुधारण्यास मदत करते. या कौशल्याची मागणी जास्त आहे कारण ऑनलाइन दृश्यमानता वाढणे म्हणजे अधिक रहदारी, ज्यामुळे अनेकदा रूपांतरण दर वाढतो. अखेरीस, यामुळे कंपनीची विक्री आणि महसूल वाढण्यास मदत होते.

Success Story: रूम भाड्याने देऊन काय करणार? असं म्हणायचे लोकं; आला राग अन् उभी केली 8,000 कोटींची कंपनी

कन्टेन्ट रायटिंग

ऑनलाइनच्या या युगात ऑनलाइन बातम्यांपासून ते ऑनलाइन मासिके आणि पुस्तकांपर्यंत प्रचलित आहे. यावेळी जर कोणाला आशय कसा लिहायचा हे माहित असेल तर त्याच्यासाठी एक नाही तर हजारो करिअरच्या संधी आहेत. कंटेंट रायटर होण्यासाठी तुम्ही शॉर्ट कन्टेन्ट आयटींग कोर्स करू शकता.

बरीच वर्षं झालीत त्याच पदावर काम करताय? मग 'या' टिप्स तुमच्या कामाच्या; लगेच मिळेल प्रमोशन

फोटो एडिटिंग

आजकाल लोक प्रोफेशनल फोटोग्राफीकडे जास्त लक्ष देतात. फोटोशॉप सारख्या इतर फोटो एडिटर सॉफ्टवेअरद्वारे फोटो एडिट कसे करायचे हे कोणाला माहीत असेल, तर त्याला कमाईचा विचार करावा लागणार नाही. फोटो एडिटिंगसाठी अनेक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमही करता येतात. किंवा तुम्ही फोटो एडिटिंग कोर्स अगदी काही दिवसात घरी शिकू शकता.

पोलीस विभागात भरतीचं स्वप्न बघताय? मग पात्रतेपासून पदांपर्यंत ही माहिती असणं IMP

व्हिडिओ एडिटिंग

सध्या YouTube आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर व्हिडिओंच्या माध्यमातून कंटेंट शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ एडिटरची मागणी वाढली आहे. व्हिडिओ एडिटिंगमध्ये पारंगत असलेले लोक या क्षेत्रात भरपूर कमाई करू शकतात. व्हिडिओ एडिटर होण्यासाठी अॅनिमेशन किंवा एडिटिंग संबंधित कोर्सेस करता येतात. तुम्ही व्हिडीओ एडिटिंग कोर्स अगदी काही दिवसात घरी शिकू शकता.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Online education