मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

बरीच वर्षं झालीत त्याच पदावर काम करताय? मग 'या' टिप्स तुमच्या कामाच्या; लगेच मिळेल प्रमोशन

बरीच वर्षं झालीत त्याच पदावर काम करताय? मग 'या' टिप्स तुमच्या कामाच्या; लगेच मिळेल प्रमोशन

असं घडलं काय?

असं घडलं काय?

आज आम्ही तुम्हाला याचबद्दल काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 ऑक्टोबर: आजकालच्या काळात नोकरीत बढती किंवा वेतनवाढ मिळविण्यासाठी कठोर परिश्रमापेक्षा स्मार्ट वर्कची जास्त गरज आहे. काही जॉब स्किल्स तुम्हाला तुमच्या करिअरच्या प्रत्येक वळणावर यश मिळवण्यास मदत करतात मात्र हे स्किल्स तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. काही लोक खूप हुशार असूनही त्यांच्या करिअरमध्ये फार यश मिळवू शकत नाहीत. वास्तविक, करिअरची वाढ म्हणजेच तुमचे यश अनेक घटकांवर अवलंबून असते. तुमच्या वागण्या बोलण्यासोबतच काही स्किल्सही महत्त्वाचे असतात. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.

काम करत राहा

तुम्ही तुमचे काम मनापासून करा. पूर्ण प्रामाणिकपणे केलेले काम नेहमीच दिसून येते. तुमचा बॉसही याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. प्रमोशनसाठी तुमच्या यादीत या गोष्टीचा समावेश करा आणि तुमचे धोरण ठेवा आणि त्यानुसार काम करा. तुम्ही कंपनीचे मालक असोत किंवा कार्यरत कर्मचारी तरीही आपलं काम करत राहा.

12वी असो की ग्रॅज्युएट तब्बल 64,000 रुपये महिना पगाराची नोकरी; 'या' नॅशनल इन्स्टिटयूटमध्ये करा अप्लाय

कष्ट करा, फळ नक्की मिळेल

काम करण्यापूर्वी आपण अनेकदा विचार करतो की त्याचे परिणाम काय असतील. परिश्रमाशिवाय काहीही साध्य होत नाही हे लक्षात ठेवा. जर आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. त्यामुळे फळाची काळजी करा पण मेहनत करा.

कामात नवीन कल्पना आणा

काम कोणतेही असो, नेहमी तुम्हाला मिळालेल्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करा. या भूमिकेतून तुम्ही भविष्यात किती पुढे जाऊ शकता याची कल्पना येऊ शकते. तसेच, तुमचा कोणताही प्रकल्प तुम्ही कसा हाताळता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तो तुमची भूमिका वाढवू शकतो किंवा नाही. तुमच्या कामात नवीन कल्पना आणा आणि त्या लागू करा.

Success Story: रूम भाड्याने देऊन काय करणार? असं म्हणायचे लोकं; आला राग अन् उभी केली 8,000 कोटींची कंपनी

मेहनत आणि प्रामाणिकपणा आवश्यक

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमासोबत प्रामाणिकपणा आवश्यक आहे. चुकीचे मार्ग आपल्याला नक्कीच वर नेऊ शकतात परंतु हे काही काळासाठीच घडते. सत्याचा आणि परिश्रमाचा मार्ग भलेही लांब असेल पण तो मार्ग तुम्हाला जीवनात पदोन्नतीसह सन्मान देईल आणि पुढे जाण्यास मदत करेल.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert