मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कुठल्याही परीक्षेविना DRDO मध्ये उत्तम नोकरीची संधी; असा करा अर्ज

कुठल्याही परीक्षेविना DRDO मध्ये उत्तम नोकरीची संधी; असा करा अर्ज

DRDO

DRDO

बेरोजगार युवकांसाठी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : बेरोजगार युवकांसाठी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. डीआरडीओने डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ फिजिऑलॉजी अँड अलाईड सायन्सेसअंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक असणारे पात्र उमेदवार विविध पदांसाठी डीआरडीओच्या drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. थेट https://drdo.gov.in/ या लिंकच्या माध्यमातून शिकाऊ पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेसाठी DRDO Recruitment 2022 Notification PDF यावर जाऊन अधिकृत सूचना प्राप्त करता येऊ शकते. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 17 पदे भरली जाणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा

डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ फिजिऑलॉजी अँड अलाईड सायन्सेसअंतर्गत अप्रेंटिस पदासाठी अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबर रोजी सुरू झाली. 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. एकूण 17 पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी पात्रता व शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, अर्ज करणाऱ्या तरुणाकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/डिप्लोमा असणं आवश्यक आहे. त्याशिवाय एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी प्रशिक्षण किंवा नोकरीचा अनुभव असणं गरजेचं आहे.

हेही वाचा -  Twitter Mass Resignation : ट्विटरवर आली ऑफिसेस बंद करण्याची वेळ; कर्मचाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

अशी असेल निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही पात्रतेच्या आधारावर केली जाईल. उमेदवाराच्या गुणांच्या आधारे ही निवड होईल. निवड झाली असल्यास त्याबाबत उमेदवारांना माहिती दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीवर रूजू करून घेताना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जमा करणं आवश्यक असेल.

प्रवर्गनिहाय अशा असतील जागा

डीआयपीएएसअंतर्गत डिप्लोमा अप्रेंटिस या पदावर काम करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. या पदासाठी डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंगसाठी अनारक्षित 2, इतर मागास प्रवर्गातील 2 जागा आहेत. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये अनारक्षित 2 व ईडब्ल्युएसमध्ये 1 अशा तीन जागा आहेत. डिप्लोमा इन मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिससाठी अनारक्षित 4, इतर मागास प्रवर्गासाठी 3, अनुसूचित जातीसाठी व जमातीसाठी आणि इडब्ल्युएसमध्ये प्रत्येकी 1 अशा 10 जागा असणार आहेत. तिन्ही जागांसाठी दरमहा 8,000 रुपये मानधन मिळेल. डीआयपीएएचे संचालकांकडून सर्व अर्जांची छाननी करून रिक्त जागांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदावर ट्रेनिंगचा काळ 12 महिन्यांचा असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षांचा ट्रेनिंगचा कॉन्ट्रॅक्ट करावा लागणार आहे.

First published:

Tags: Central government, Government, Job, Job alert