मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank Jobs: श्री कन्यका नागरी सहकारी बँक इथे विविध जागांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अर्ज

Bank Jobs: श्री कन्यका नागरी सहकारी बँक इथे विविध जागांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अर्ज

असा मिळवा बँकेत PO म्हणून जॉब

असा मिळवा बँकेत PO म्हणून जॉब

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

चंद्रपूर, 18 नोव्हेंबर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड (Shri Kanyaka Nagari Sahakari Bank Chandrapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शाखा व्यवस्थापक, सहायक लेखापाल, लिपिक, शिपाई या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

शाखा व्यवस्थापक (Branch Manager)

सहायक लेखापाल (Assistant Accountant)

लिपिक (Clerk)

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - उमेदवार कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर असावेत तसंच बँकिंग क्षेत्रातील दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.

सहायक लेखापाल (Assistant Accountant) - उमेदवार कॉमर्स शाखेतून पदव्युत्तर असावेत तसंच बँकिंग क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

लिपिक (Clerk) - उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावेत तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक.

शिपाई (Peon) - उमेदवाराचं आठवीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

MPSC Recruitment: MPSC तर्फे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा भरती जाहीर

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

रघुवंशी कॉम्प्लेक्स सिटी मागे, बाजार वार्ड, चंद्रपूर – 442402

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2021

JOB TITLEKanyaka Bank Chandrapur Recruitment 2021
या जागांसाठी भरतीशाखा व्यवस्थापक (Branch Manager) सहायक लेखापाल (Assistant Accountant) लिपिक (Clerk) शिपाई (Peon)
शैक्षणिक पात्रताउमेदवार कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर असावेत तसंच बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तारघुवंशी कॉम्प्लेक्स सिटी मागे, बाजार वार्ड, चंद्रपूर – 442402

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब, बँक