मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Interview Tips: मुलाखतीदरम्यान Salary Expectations च्या प्रश्नाला घाबरु नका; असं द्या निर्भीड उत्तर

Interview Tips: मुलाखतीदरम्यान Salary Expectations च्या प्रश्नाला घाबरु नका; असं द्या निर्भीड उत्तर

जॉब मुलाखत

जॉब मुलाखत

आज आम्ही तुम्हाला Salary Expectations च्या प्रश्नाचं उत्तर न घाबरता आणि स्मार्ट (How to give smart answers in Interview) पद्धतीनं कसं देणार याबद्दल सांगणार आहोत.

मुंबई, 16 फेब्रुवारी: कोणत्याही जॉबची मुलाखत (Job Interview) देताना काही प्रश्न खूप कॉमन (Common questions in Job Interview) असतात. जसं की स्वतःबद्दल काही सांगा किंवा तुम्हाला ही नोकरी का हवी आहे? यामध्ये अजून एक प्रश्न असा असतो जो प्रश्न जवळपास सर्व मुलाखतींमध्ये विचारला जातो, तो म्हणजे "हा जॉब करताना तुम्हाला किती पगार हवा आहे?" (What is Your salary Expectations?) हा प्रश्न जरी कॉमन आणि साधा वाटत असेल तरी या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचा पगार (Answer for Salary Expectation question) अवलंबून असतो. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर अगदी तोलून मोजून-मापून आणि अंदाज घेऊन देणं आवश्यक आहे. बरेचजण इथे घाबरतात आणि नाही ते बोलून (How to give answers in Job Interview) जातात. पण आता चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला Salary Expectations च्या प्रश्नाचं उत्तर न घाबरता आणि स्मार्ट (How to give smart answers in Interview) पद्धतीनं कसं देणार याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या.

बरेचदा या प्रश्नाचं उत्तर देताना अनेकजण आपल्या पोस्टपेक्षा अधिक पगाराची मागणी करतात, यामुळे त्यांच्यातील जॉबबद्दलची आवड कमी आहे असं दिसतं. तर काही जण घाबरून पोस्टला मिळणाऱ्या पगारापेक्षा कमी सॅलरी सांगतात त्यामुळे त्यांना कमी पगारात जब करावा लागतो. म्हणूनच या प्रश्नाचं चोख उत्तर कसं द्यावं याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊ.

फ्रेशर्सना नोकरी मिळत नाही ही अंधश्रद्धा आता विसरा; 'या' टिप्समुळे मिळेल Job

रिसर्च आवश्यक

कंपनीचा उद्योग आणि कंपनीचं प्रोडक्शन इथपर्यंत सर्व आवश्यक माहितीसह स्वतःला तयार करा. आवश्यक माहितीबाबत रिसर्च करणं आवश्यक आहे कारण ते तुम्हाला चांगल्या निगोसिएशन करण्यात मदत करेल. जर तुम्हाला कंपनीबद्दल माहिती असेल आणि स्वतच्या प्रोफाईलबद्दल माहिती असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पगाराबद्दल बोलू शकाल.

स्वतःची बाजू मांडा

यासाठी HR ला आधीच कळवा की तुम्ही योग्य करिअरची दिशा शोधत आहात जी तुम्हाला कंपनीला सेवा देण्यासाठी योग्य ठरेल. पगार किंवा मोबदला यापेक्षा अधिक योग्य नोकरी असणं जास्त आवश्यक आहे. मात्र हे सांगताना पगाराबाबाबत विसरू नका. त्यांना खात्री द्या की तुमच्या गरजा अचूक आहेत आणि तुम्ही पगारासोबतच कंपनीत चांगल्या पद्धतीनं कामही कराल.

उत्तर देण्यास टाळा

जर तुम्ही मुलाखतीच्या या भागात या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसाल तर, तुम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला नोकरी आणि जॉब प्रोफाइलबद्दल अधिक जाणून घ्यायचं ते असं सांगून मुलाखत घेणाऱ्यांना काही काळ थांबवू शकता आणि पगाराबतच्या प्रश्नावर विचार करू शकता.

MBA की MCA? ग्रॅज्युएशननंतर नक्की कोणत्या क्षेत्रात करावं PG; जाणून घ्या माहिती

हे आहे बेस्ट उत्तर

जर तुमच्यात संपूर्णपणे आत्मविश्वास असेल आणि तुम्ही नोकरीसाठी तयार असाल तर मुलाखत घेणाऱ्यांना तुम्हाला जितका पगार हवाय त्याची एक रक्कम सांगा. या पुढे काहीही बोलू नका. तुम्ही सांगितलेली रक्कम ही पूर्णपणे रिसर्च केल्यानंतरच सांगा.अवाजवी रक्कम सांगू नका. तुम्ही सांगितलेली रक्कम बरोबर असेल तर यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास मुलाखत घेणाऱ्यांना दिसेल आणि तुम्हाला हव्या त्या पगारात नोकरी मिळू शकेल.

First published:

Tags: Career, Career opportunities, Salary, Tips, जॉब