मुंबई, 22 मार्च: : कोरोनामुळे संपूर्ण जगभरात औषधांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्व फार्मसी क्षेत्रातही (Career in Pharmacy Field) कंपनी आणि कर्मचारी जोमात आहेत. अनेक वर्ष विद्यार्थ्यांचा कमी कल असलेल्या फार्मसी क्षेत्राला (education in Pharmacy) पुन्हा उभारी मिळाली आहे. मात्र हे फार्मसी क्षेत्र नक्की आहे तरी काय? आणि या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी (Career opportunity in Pharmacy Field) कशा मिळतील? यासाठी या क्षेत्रात नक्की कसं शिक्षण घ्यावं? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. फार्मसीचा थेट संबंध औषधांशी आहे फार्मसीमध्ये औषध बनवण्याची पद्धत, कोणत्या रोगासाठी कोणते औषध आहे, औषधाचे प्रमाण, कोणते औषध सोबत घेऊ नये, आदी कामे फार्मसीअंतर्गत येतात. जर तुम्हाला फार्मसीमध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हाला बी.फार्म (B.Pharma), एम.फार्म (M.Pharma) किंवा इतर काही डिप्लोमासारखे पदवी अभ्यासक्रम करावे लागतील. JOB ALERT: पुण्यतील ‘या’ सहकारी बँकेत मॅनेजर पदांसाठी होणार पदभरती; करा Apply काय आहे B.Pharma ? B.Pharma हा 12वी नंतर 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या कोर्समध्ये फार्मसीशी संबंधित प्रत्येक माहिती जसे की औषधे बनवणे, त्यांची चाचणी करणे इ. अशी माहिती दिली जाते. हा कोर्स अशा लोकांसाठी आहे ज्यांना वैद्यकशास्त्रात रस आहे किंवा बायोकेमिक क्षेत्रात करिअर करायचे आहे. हा 4 वर्षांचा कार्यक्रम पूर्ण करून फार्मसीमध्ये चांगले भविष्य निर्माण केले जाऊ शकते. यासाठीची शैक्षणिक पात्रता (Eligibility for B.Pharma) बारावी विज्ञान (जीवशास्त्र) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बी.फार्मसाठी अर्ज करू शकतात. काही महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाते, तर काही महाविद्यालयांमध्ये बी.फार्मासाठी प्रवेश परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि काउन्सिलिंगच्या आधारे प्रवेशही उपलब्ध असतात. B.Pharma करण्याचे फायदे बी.फार्म केल्यानंतर तुम्ही केमिस्ट म्हणून नोकरी करू शकता. जर तुम्हाला तुमचे स्वतःचे मेडिकल स्टोअर उघडायचे असेल तर तुम्ही त्यासाठी परवाना मिळवू शकता. कॉलेजमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. सरकारी आणि निमसरकारी विभागांच्या संशोधन विभागात काम करू शकता. B.Pharm ही पदवीपूर्व पदवी आहे जी सर्वत्र उपयोगी पडेल. खूशखबर! SSC तर्फे मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरतीची मोठी घोषणा; करा अप्लाय
B.Pharma नंतर काय?
B.Pharma नंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. B.Pharm केल्यानंतर, तुम्ही वर नमूद केलेल्या विविध क्षेत्रात नोकरी करू शकता किंवा तुम्ही स्वतःचे मेडिकल स्टोअर देखील उघडू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवत M.Pharm देखील करू शकता. M.Pharm ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचीही तरतूद आहे, ज्याची माहिती आम्हाला आमच्या पुढील पोस्टमध्ये मिळेल.