पुणे, 28 जून : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकाल तर लागला, पण आता पुढे काय? करिअरमध्ये चांगली भरारी घेण्यासाठी पुढे कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेणं आवश्यक आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आले असतील. मात्र, तुम्ही जर बारावीनंतर बीए लिबरल आर्टस् (B.A liberal arts) या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार असाल तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बीए लिबरल आर्टस् (B.A liberal arts course in pune university) या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रेवश प्रक्रिया अर्जाला सुरुवात झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रेवश प्रक्रिया बद्दल… कोर्स किती वर्षांचा आहे? बीए लिबरल आर्टस् हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला पात्र ठरतो. विज्ञान, कला, मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापन अशा विविध विद्याशाखांमधील अनेक विषयांची एकमेकांशी सांगड घालणारा, तसेच आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देणारा लिबरल आर्टस् हा अभ्यासक्रम आहे. वाचा :
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता छगन भुजबळ; राज्यातील मंत्र्यांना कोरोनानं घेरलं; झाले क्वारंटाईन
विद्यार्थ्यांची मर्यादा किती आहे? विद्यापीठातील या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 50 इतकी आहे. कोणत्याही शाखेतून, कोणत्याही बोर्डातून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेशास घेवू शकतो. अर्थात त्यासाठी प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवावे लागतील. हा अभ्यासक्रम विद्यापीठात चालविला जात असल्याने आरक्षण व प्रवेशांसंबधीचे राज्य सरकारने केलेले सर्व नियम व सवलती इथे लागू आहेत. विद्यार्थी- विद्यार्थिनींना वसतीगृहाच्या मर्यादित जागाही उपलब्ध आहेत.
गुगल मॅपवरून साभार…
प्रेवश कसा घ्यायचा? या अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश परीक्षा यावर्षी 21 जुलै 2022 रोजी होणार आहे. राज्यातील आणि देशातील विविध शहरांमधील केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा 100 गुणांची आणि बहुपर्यायी असेल. प्रवेश परीक्षेचा सिल्यॅबस व इतर माहिती बीए लिबरल आर्टस अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावर आहे. http://www.unipune.ac.in/snc/interdisciplinary_school_science/IDSS_Phase_1/ba-liberal-arts.html या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज व संबंधित इतर माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स (IDSS), IUCAA जवळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड, पुणे - 411007 या पत्त्यावरही तुम्ही भेट देऊ शकता. तसेच bla.idss.sppu@gmail.com ईमेलवरही संपर्क करू शकता.

)







