Polytechnic Admissions 2022: पटापट अपलोड करा तुमचे मार्क्स; डिप्लोमासाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरु
Polytechnic Admissions 2022: पटापट अपलोड करा तुमचे मार्क्स; डिप्लोमासाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरु
डिप्लोमासाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरु
विद्यार्थ्याच्या सोयीसाठी पॉलिटेक्निकची अर्ज प्रक्रिया (Diploma Admissions Procedure 2022) सुरु आहे. ता विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि इतर निकालासंबंधीची माहिती प्रवेश पोर्टलवर अपलोड करता येणार आहे.
मुंबई, 18 जून: 03 जून 2022 पासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला (Polytechnic Admissions Process 2022) आजपासून सुरुवात झाली आहे. दहावीचा निकाल लागण्या आधीच विद्यार्थ्यांना आपली माहिती भरण्यासाठी ही प्रोसेस सुरु कार्नाय्त आली होती. या प्रवेश पोर्टलच्या (Poly Admissions Portal) उदघाटनाच्या वेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली होती. आता निकाल जाहीर झाला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आता डिप्लोमा प्रबंधासाठी पुढची तयारी करावी लागणार आहे.
विद्यार्थ्याच्या सोयीसाठी पॉलिटेक्निकची अर्ज प्रक्रिया (Diploma Admissions Procedure 2022) सुरु आहे. तसंच निकाल लागण्याची आधी विद्यार्थ्यांना आपली संपूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड करायची होती. आता विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि इतर निकालासंबंधीची माहिती प्रवेश पोर्टलवर अपलोड करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना https://msbte.org.in/हा ऑफिशिअल वेबसाईटवर नजर असणं आवश्यक आहे.
Career After 10th: मार्क्स कमी पडलेत तरी राहा बिनधास्त; 11वीमध्ये स्ट्रीम निवडण्यासाठी एक्सपर्ट्सने दिला सल्लाकाय असेल पुढची प्रोसेस
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आपले गुण माहिती आहेत. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि इतर गोष्टी अपलोड करता येतील. विद्यार्थ्यांचे मार्क्स बघूनच त्यानंतर मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे त्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे.
अनाथ विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा
यंदा पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा विशेष कल असणार आहे त्यामुळे यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असणार आहे. म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांनी आई-वडील कोरोनामुळे गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये दोन जागा राखीव असणार आहेत. तसंच अशा विद्यार्थ्यांचा पन्नास हजारपर्यंतचा शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
MH 11th Admissions: अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलीत ना? मग दुसऱ्या टप्प्याची सुरु करा तयारी; इथे मिळतील LinksITI नंतरही मिळणार Poly ला प्रवेश
विशेष म्हणजे ITI पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांशी आता जुनिअर इंजिनिअर होता येणार आहे. यासाठी त्यांना ITI चं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येणार आहे. तसंच अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही शाखेत प्रवेश घेता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.