जळगाव, 14 डिसेंबर : जळगावच्या एका तरुणाने अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. त्याच्या वडिलांनी ज्याठिकाणी सैन्यदलात शिपाई म्हणून शपथ घेतली होती, त्याचठिकाणी या तरुणाने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट अधिकारी म्हणून शपथ घेतली. राहुल पाटील असे या लेफ्टनंट अधिकारी झालेल्या सैनिक पुत्राचे नाव आहे.
पाच वर्ष खडतर प्रशिक्षण -
राहुल या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावचे शरद पाटील यांचा मुलगा आहे. त्याने गावातील पहिला लेफ्टनंट अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. राहुलने बिहार राज्यातील गया येथे पाच वर्षे सैन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले यानंतर त्याचे वडील शरद पाटील यांनी ज्याठिकाणी सैनिक म्हणून शपथ घेतली होती, त्याचठिकाणी त्याने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट अधिकारी म्हणून शपथ घेतली.
प्रेरणादायी प्रवास -
ग्रामीण भागातील या तरुण अधिकाऱ्याची प्रवास हा आजच्या तरुणाईला प्रेरणादायी आहे. राहुल पाटील या तरुणाने प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण हे नागपूर येथील आर्मी स्कूल येथे पूर्ण केले. येथे त्याने सैन्यदलात अधिकारी होण्याचा ध्यास घेतला. आर्मी स्कूल अंतर्गत घेण्यात आलेल्या एनडीए परिक्षेचा निकाल लागला. 2019 साली त्याने ही परिक्षा दिली होती. त्यात या तरुणाने प्रेरणादायी यश संपादन करत लेफ्टनंट अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
हेही वाचा - मालेगावातील शेतकऱ्याच्या पोरीची कमाल, MPSC मध्ये उत्तीर्ण होऊन बापाचं स्वप्न केलं साकार
सर्वत्र कौतुक -
आई वडिलांनी ज्या मेहनतीने कष्ट करुन आपल्या मुलाला मोठे केले, त्याने आज त्यांच्या परिवाराच्या मेहनतीचे चीज केले आहे. राहुलने या परिक्षेत महाराष्ट्रातील मुलांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सैनिकाच्या मुलाच्या या अभिमानास्पद कामागिरीबाबत त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Jalgaon, Success story