नाशिक, 13 डिसेंबर : शहरी भागात सुविधा जास्त असतात. त्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा कमी असतात. मात्र, कमी सुविधा असूनही अनेक जण यशाला गवसणी घालतात. शेतकरी कुटुंबातून आलेल्या हर्षाली पवार या तरुणीनेही याचप्रकारे यशाला गवसणी घातली आहे. त्यांचे आई वडील हे शेतकरी आहेत. शेतकरी कुटुंबातील हर्षाली पवार या तरुणीने राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. असा राहिला हर्षालीचा प्रवास - हर्षाली पवार पवार हिने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. यानंतर जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत केबीएच कनिष्ठ महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाली. तिची आई वंदना आणि वडील निंबा पवार हे शेती करतात. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील ही तरुणी बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना सुट्टीच्या दिवशी आईला मदत करण्यासह शेतीतील कामेही करत होती. मुलीने खूप शिकावे अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. त्यामुळे हर्षालीने जळगा येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेत बी. एस्सी. ॲग्री पदवी संपादन केली. यानंतर स्पर्धा परिक्षा करण्याचा तिने विचार केला. दरम्यान, कोरोना काळात परिस्थिती बदलली. शाळा कॉलेज सर्वच बंद झाले. त्यामुळे परिक्षाही रद्द झाल्यात. परिक्षा कधी होणार याबाबत अनिश्चितता होती. हेही वाचा - UPSC ची मुलाखत 10 दिवसांवर अन् वडिलांचं छत्र हरपलं, तरीही डगमगला नाही सातारचा तरुण! या काळात तिला आई- वडीलांसह मैत्रीणींचे भावनिक, मानसिक पाठबळ भक्कम आधार ठरला. अखेर मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील शेतकरी कन्येने राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाला गवसणी घातली. तसेच स्पर्धा परिक्षेतील या प्रवासात मार्गदर्शक गुरुजण, दोन्ही बहिणी, नातलग, मित्र- मैत्रीणींची प्रेरणा उपयुक्त ठरली आहे, असे ती सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.