Home /News /career /

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना मिळणार परदेशात ट्रेनिंग; शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार उचलणार मोठी पावलं

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांना मिळणार परदेशात ट्रेनिंग; शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार उचलणार मोठी पावलं

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शालेय शिक्षण शिक्षण आणखी उत्तम व्हावं या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

    मुंबई, 21 मार्च: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा आणि शालेय शिक्षणाला मोठा फटका बसला. संपूर्ण शिक्षण ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं सुरु असल्यामुळे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी झाला होता. शालेय शिक्षण विभागालाही शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पावलं उचलता येत नव्हती. मात्र आता शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School education Minister Varsha Gaikwad) यांनी राज्यातील शालेय शिक्षण शिक्षण आणखी उत्तम व्हावं या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारकडून यंदा पहिल्यांदा dptc मार्फत 5% निधी हा शाळेच्या मूलभूत सोयींसाठी ठेवण्यात आला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवरच लक्ष देतोय असं नाही तर बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम सुरु आहे असंही शाळेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. JOB ALERT: केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत 95,000 पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज शाळांना मिळणार या सुविधा यंदा निजामकालीन शाळांसाठी एकूण 160 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तर आदर्श शाळांसाठी या वर्षी 54 कोटी तर पुढल्या वर्षी 300 कोटी ठेवण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात e-लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. तसंच टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे हे कोरोनामुळे समजलं आहे त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर आणि लँग्वेज लॅबची सोय करण्यात येणार आहे असंई शिक्षणमंत्री म्हणाल्या. यंदा विभागीय स्तरावर सायन्स सिटीज तयार करण्यात येणार आहेत. तसंच इंटिग्रेटेड आणि मराठी- इंग्लिश अशा भाषांमध्ये आभासक्रम तयार करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे यंदा कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना good touch आणि bad touch अशाप्रकारचं शिक्षण दिलं जाणार आहे. रेल्वेत नोकरीची ही संधी सोडू नका; मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' जागांसाठी Vacancy शिक्षकांना परदेशात मिळणार प्रशिक्षण शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी शालेय शिक्षकांना फिनलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Maharashtra News, School, Varsha gaikwad

    पुढील बातम्या