आंध्र प्रदेश बोर्डाचे आज निकाल, कसा आणि कुठे पाहायचा Inter RESULT

आंध्र प्रदेश बोर्डाचे आज निकाल, कसा आणि कुठे पाहायचा Inter RESULT

आंध्र प्रदेश बोर्डाचे निकाल 'न्यूज 18 लोकमत'वरही आपल्याला पाहता येणार आहे.

  • Share this:

हैदराबाद, 12 जून : (ap intermediate results 2020) आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एजुकेशन (Andhra Pradesh Board of Intermediate Education - BIEAP) इंटर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहेत. या परीक्षांचे निकाल विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर bie.ap.gov.in साधारण संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास निकाल घोषित केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एजुकेशन आंध्र प्रदेश दरवर्षी इंटर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा घेत असून त्याचे निकाल (ap intermediate results 2020) ऑनलाइन जाहीर करते. अधिकृत संकेतस्थळावर सर्वच विद्यार्थी एकावेळी निकाल पाहात असल्यानं वेबसाइट लोड होण्यासाठी वेळ लागतो. यासाठी न्यूज 18 लोकमतनेही आपल्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची व्यवस्था केली आहे.

इथे पाहा निकाल.

कसा पाहायचा निकाल

सर्वात पहिल्यांदा आपलं वर्ष कोणतं आहे त्यानंतर नाव, मोबाईल नंबर ई-मेल आयडी अपलोड करायचा त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी?

इयत्ता 12 वीचा (Maharashtra HSC Result 2020) निकाल बुधवारी लागणार अशी चर्चा होती मात्र हा निकाल 10 जूनला लागणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं निकाल उशिरा लागू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उच्च न्यायालयानं महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 12 वीच्या (Maharashtra HSC Result 2020) उत्तरपत्रिकांचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं हे निकाल उशिराला जाहीर केले जातील असे संकेत महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

हे वाचा-10 वी आणि 12 वीचा निकाल आज नाही, 20 दिवस करावी लागणार प्रतीक्षा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 12, 2020, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading