मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

30 नोव्हेंबरपर्यंत स्वत: राजीनामे द्या; भारतीय कर्मचाऱ्यांना अ‍ॅमेझॉनच्या सूचना

30 नोव्हेंबरपर्यंत स्वत: राजीनामे द्या; भारतीय कर्मचाऱ्यांना अ‍ॅमेझॉनच्या सूचना

अ‍ॅमेझॉनने आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्माचारी कपात सुरू केली आहे.

अ‍ॅमेझॉनने आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्माचारी कपात सुरू केली आहे.

अ‍ॅमेझॉनने आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्माचारी कपात सुरू केली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : जगातील सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो. अ‍ॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. इतर मोठ्या कंपन्यांप्रमाणे या कंपनीवरदेखील कर्मचारी कपात करण्याची वेळ आली आहे.

अ‍ॅमेझॉनने आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्माचारी कपात सुरू केली आहे. यामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉनने आपल्या काही भारतीय कर्मचाऱ्यांना स्वेच्छेनं राजीनामा देण्यास आणि आर्थिक लाभांसह कंपनी सोडण्यास सांगितलं आहे.

अ‍ॅमेझॉनने या आठवड्यात जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनेक भारतीय कर्मचाऱ्यांनी व्हॉलेंटरी सेपरेशन प्रोग्रॅमचा (VSP)अवलंब करण्याची योजना आखली आहे. कारण, कंपनीने त्यांचा करार संपुष्टात आणण्याऐवजी म्हणजे काढून टाकण्याऐवजी स्वेच्छेने राजीनामा देण्यास सांगितलं आहे.

कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागानं अनेक कर्मचाऱ्यांना स्वत: 'बायआउट' घेण्याच्या ऑफर पाठवल्या आहेत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, कंपनीच्या 'एक्सपिरिअन्स आणि टेक्नॉलॉजी' टीममधील L1 ते L7 बँडमध्ये काम करणार्‍या काही भारतीय कर्मचाऱ्यांना कंपनीकडून व्हीएसपी नोट मिळाल्या आहेत.

कर्मचार्‍यांनी व्हीएसपी पर्याची निवड केल्यास, त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत कंपनी सोडावी लागणार आहे. जर त्यांनी नमूद तारखेपूर्वी कंपनी सोडली तर त्यांना कंपनीकडून आर्थिक लाभदेखील दिला जाणार आहे.

विविध विभागांमधील हजारो कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे, या वृत्ताला बुधवारी (23 नोव्हेंबर) अ‍ॅमेझॉनने दुजोरा दिला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डेव्हिड लिंप म्हणाले, "अ‍ॅमेझॉन टीम्सचं विलीनीकरण करत आहे. या निर्णयामुळे काही पदांची आणि पर्यायानं कर्मचाऱ्यांची या पुढे आवश्यकता राहणार नाही.

कंपनी सध्या असामान्य आणि अनिश्चित व्यापक आर्थिक घडामोडींचा सामना करत आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी आणि व्यवसायासाठी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत. सखोल विचार केल्यानंतर, आम्ही काही टीम्स आणि प्रोग्रॅम्स एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे."

डेव्हिड लिंप यांच्या ई-मेलनंतर कर्मचाऱ्यांना व्हीएसपी नोट पाठवण्यात आल्या आहेत. या नोटमधील माहितीनुसार, व्हीएसपीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभांच्या बदल्यात स्वेच्छेने नोकरीतून राजीनामा देण्याची संधी असेल. व्हीएसपीमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6:30 वाजेपर्यंत स्मार्ट फॉर्म जमा करणं आवश्यक आहे.

जर कर्मचाऱ्यांनी व्हीएसपी योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पगारातील 22 आठवड्यांचा बेसिक पे मिळेल तसंच त्या आधीचे सहा महिने नोकरी केल्याबद्दल त्या प्रत्येक सहा महिन्यांसाठी एका आठवड्याची बेसिक सॅलरी दिली जाईल.

आठवड्याचा बेसिक पे हा जास्तीतजास्त 22 आठवड्यांपर्यंत दिला जाईल. याशिवाय, कर्मचार्‍यांना विमा लाभ पॉलिसीनुसार सहा महिन्यांसाठी वैद्यकीय विमा संरक्षण किंवा समतुल्य विमा प्रीमिअम रक्कम दिली जाईल. मात्र, कार्यप्रदर्शन सुधारणा कार्यक्रमामधील (पीआयपी) कर्मचारी व्हीएसपीसाठी पात्र ठरणार नाहीत.

First published:

Tags: Amazon