Home /News /career /

CBSE Board Result 2021: विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा; बोर्डाचे आदेश

CBSE Board Result 2021: विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळा; बोर्डाचे आदेश

शाळा आपल्या मनानुसार विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत असे आदेश बोर्डानं दिले आहेत.

    नवी दिल्ली, 27 जुलै: राज्यात दहावीचा निकाल (SSC Result 2021) लागल्यानंतर आता CBSE चा दहावी आणी बारावीचा (CBSE 10th Result 2021) निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सर्वात आधी जाहीर होणारा CBSE दहावी आणि बारावीचा निकाल (CBSE 10th 12th Result 2021) यंदा कोरोनामुळे उशिरा जाहीर होत आहे. मात्र आता त्यात CBSE बोर्डानं शाळांसाठी फर्मान जारी केलं आहे. शाळा आपल्या मनानुसार विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत असे आदेश बोर्डानं दिले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE अंतर्गत चालवण्यात येणारी कोणतीही शाळा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मनमानीनं 95 टक्केपेक्षा जास्त गुण देणार नाही. जर कोणतीही शाळा मंडळाच्या या नियमांचं पालन करत नसेल तर बोर्ड स्वतःच अशा विद्यार्थ्यांचे गुण कमी करेल असं बोर्डानं म्हंटलंय. CBSE च्या नव्या सूचनांनुसार शाळांची मनमानी थांबवण्यासाठी मंडळानं हा निर्णय घेतला आहे. CBSE बोर्डानं असं म्हंटलंआहे की संदर्भ वर्षात ज्या विद्यार्थ्यांचा निकाल 95 टक्क्यांपेक्षा जास्त लागला होता अशा विद्यार्थ्यांनाच यावर्षी 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळू शकतात. इतर कोणालाही इतके जास्त गुण मिळू शकत नाहीत. म्हणजेच जर संदर्भ वर्षात चार विद्यार्थ्यांना 95 टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले तर यावर्षी देखील शाळा फक्त चार विद्यार्थ्यांनाच इतके गुण देऊ शकेल. हे वाचा - CBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी? हे आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण मागील तीन वर्ष 2017-18, 18-19 आणि 19-20 हे 2020-21 सत्राचे संदर्भ वर्ष मानले जातील. विशेष बाब म्हणजे संदर्भ वर्षाचा नियम केवळ मंडळानं केवळ 96, 97, 98, 99 आणि 100 गुण देण्यास वैध असेल. 95 टक्केपेक्षा कमी टक्के असलेल्या विद्यार्थ्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. निकालाच्या तारखांबाबत CBSE बोर्डाकडून अजूनही अधिकृतरित्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही.. मात्र दहावीचा निकाल (CBSE 10th Result date) जुलैच्या शेवट्पर्यंत तर बारावीचा निकाल (CBSE 12th Result) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होऊ नये ही खबरदारी CBSE घेत आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: CBSE, Exam result

    पुढील बातम्या