जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / बारावीत नापास, नंतर UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी, वाचा IAS अंजू शर्मांच्या यशाची कहाणी

बारावीत नापास, नंतर UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी, वाचा IAS अंजू शर्मांच्या यशाची कहाणी

IAS Officer Anju Sharma

IAS Officer Anju Sharma

अंजू शर्मा या इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये नापास झाल्या होत्या

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC परीक्षा उत्तीर्ण करणे हा मुलांचा खेळ नाही कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि संयम लागतो. अनेक जण यात अपयश आल्यानंतर हार मानतात तर काही जण निराश न होता पुन्हा सुरुवात करतात. आज एका अशा अधिकाऱ्याबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्या बारावीत असताना नापास झाल्या होत्या आणि नंतर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. या अधिकाऱ्याचे नाव अंजू शर्मा असे आहे. बारावीत नापास - अंजू शर्मा या इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये नापास झाल्या होत्या. तसेच 10वीच्या रसायनशास्त्राच्या प्री-बोर्डमध्येही नापास झाल्या होत्या. मात्र, इतर विषयांत त्या डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या. याबाबत अंजू शर्मा म्हणतात की, तुमच्या अपयशासाठी तुम्हाला कोणीही लक्षात ठेवत नाहीत. केवळ तुम्ही तुमच्या यशामुळे लक्षात राहतात. त्यांच्या आयुष्यातील दोन घटनांनीच त्याचे भविष्य घडवले, असा त्यांचा विश्वास आहे. अंजू शर्मा सध्या कुठे कार्यरत -  अंजू शर्मा यांनी 1991 मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या सध्या सरकारी शिक्षण विभाग (उच्च आणि तंत्रशिक्षण), सचिवालय, गांधीनगर येथे प्रधान सचिव आहेत. त्यांनी गांधीनगरमध्ये जिल्हाधिकारी आणि भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. यासोबतच त्यांनी NRHM मध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवा दिली आहे. अंजू एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या की, ‘प्री-बोर्डच्या काळात त्यांना खूप चॅप्टर्स वाचायचे होते आणि जेवणानंतर मला अभ्यास करायचा होता. मग मी घाबरू लागले कारण मी काहीही तयारी केली नव्हती आणि मला माहित होते की मी नापास होणार आहे. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाने 10 वी मधील कामगिरी किती महत्त्वाची आहे यावर भर दिला. कारण दहावीच्या गुणानंतर पुढच्या उच्च शिक्षणाचा मार्ग ठरतो. हेही वाचा -  नोकरी सोडली अन् UPSC करण्याचा निर्णय; दोन वेळा अपयश मात्र, थेट IAS पदाला गवसणी मात्र, या कठीण काळात अंजू शर्मा यांच्या आईने त्यांना धीर दिला आणि प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणाच्या अभ्यासावर अवलंबून राहू नये, हा धडाही त्यांनी शिकविला. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच कॉलेजच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि यानंतर त्यांनी कॉलजमध्ये सुवर्णपदकही मिळवले. त्यांनी जयपूरमधून बीएससी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या अभ्यासाबाबतच्या या नियोजनामुळेच अंजू शर्मा या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि आयएएस टॉपर्सच्या यादीत सामील झाल्या. त्यांचा प्रवास हा तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात