• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • CET Exam 2021: किती मार्कांची आणि कोणत्या विषयांची असेल CET परीक्षा; असं असेल परीक्षेचं स्वरूप

CET Exam 2021: किती मार्कांची आणि कोणत्या विषयांची असेल CET परीक्षा; असं असेल परीक्षेचं स्वरूप

या परीक्षेबाबत आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.

 • Share this:
  मुंबई, 19 जुलै: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. मात्र यासाठीची नोंदणी प्रक्रिया (CET Registration process)आजपासून म्हणजेच 19 जुलैपासून सुरू होत आहे. मात्र ही परीक्षा नक्की कशी असणार? याबबाबत विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न पडले आहेत. म्हणूनच या परीक्षेबाबत आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. CET  म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या परीक्षेच्या मार्क्सवरच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे. एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात  इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Science) आणि  सामाजिक शास्त्र (Social Science)  या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे. हे वाचा - CET Exam 2021: विद्यार्थ्यांनो, 11वी प्रवेशासाठी आजपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline exam) घेतली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचं शुल्क भरलंय त्यांच्याकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही. जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: