भारतात सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सरकारी नोकरीमध्ये पात्रता, जबाबदारी आणि पदानुसार पगार व इतर सुविधा मिळतात. आज आपण भारतात सर्वाधिक पगार असलेल्या 10 सरकारी नोकऱ्या कोणत्या आहेत, ते जाणून घेणार आहोत. या संदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलंय.
IAS (Indian Administrative Service) ही सर्वांत प्रतिष्ठित आणि सर्वाधिक पगाराची सरकारी नोकरी आहे. आयएएसला 56,100 रुपये स्टार्टिंग पेमेंट मिळतं. आठ वर्षांनंतर वाढून पगार 1,31, 249 रुपये किंवा वार्षिक 15.75 लाख रुपये पगार मिळतो. आयएएसला कमाल पगार महिन्याला अडीच लाख रुपये मिळतो. IFS (Indian Forest Service) रँक व नोकरीच्या वर्षानुसार या पदासाठी पगार मिळतो. आयएफएसना 56,100 रुपये स्टार्टिंग पेमेंट असतं, तसेच इतरही अनेक अलाउन्स मिळतात. Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त माहितीये? इथे बघा 36 जिल्ह्यांची लिस्ट IPS (Indian Police Service) यांची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. आयपीएसला 56,100 रुपये स्टार्टिंग पेमेंट मिळतं. आठ वर्षांनंतर वाढू होऊन पगार 1,31,100 रुपये किंवा वार्षिक 15.75 लाख रुपये पगार मिळतो. आयपीएसला कमाल पगार महिन्याला 2.25 लाख रुपये मिळतो. RBI Grade B या पदासाठी चांगला पगार व इतर सुविधा मिळतात. पे स्केल 55,200 ते 99,750 यादरम्यान असते. डिफेन्स सर्व्हिसेस यामध्ये उमेदवारांना चांगला पगार, अलाउन्स व इतर सुविधा मिळतात. रँक व अनुभवाच्या आधारे पगार दिला जातो. DRDO मधील साइंटिस्ट, इंजिनीअर डिफेन्स रिसर्च व डेव्हलपमेंटमध्ये चांगल्या पगाराच्या सरकारी नोकऱ्या आहेत. इथे 50 हजार ते काही लाखांमध्ये पगार दिला जातो. IIT New Course: देशातील या IIT कॉलेजेसनी लाँच केले ‘हे’ टॉप नवीन कोर्सेस; JEE च्या आधारे मिळेल प्रवेश हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाचे जज हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाचे जज यांना महिन्याला 1 लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो. मोठ्या इन्स्टिट्युटमधील प्रोफेसर्स IIM, IIT, AIIMS मधील प्रोफेसर्सना चांगला पगार दिला जातो. इन्स्टिट्युट, उमेदवाराची पात्रता व अनुभव याआधारे त्यांना पगार दिला जातो. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स (PSUs) यामध्ये इंजिनीअरिंग, फायनान्स व मॅनेजमेंटच्या उमेदवारांना चांगलं वेतन दिलं जातं. ONGC, BHEL, NTPC या PSUs मध्ये नोकरदारांचा पगार लाखांमध्ये असतो. पब्लिक सेक्टर बँक एक्झिक्युटिव्ह पब्लिक सेक्टरमधील बँकेतील कर्मचाऱ्यांना पद व अनुभवाच्या आधारे महिन्याला 50 हजार ते काही लाख रुपये यादरम्यान पगार दिला जातो.