BLOG : 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ.... बीट रिपोर्टरच्या नजरेतून!

BLOG : 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ.... बीट रिपोर्टरच्या नजरेतून!

मनसेचा १३ वा वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनाची जाहिरातबाजी करताना 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक असं हेडिंग वापरण्यात आलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाकडे पत्रकार, राजकीय पक्ष आणि पक्षातील सगळ्य़ा नेते-कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं. पण....

  • Share this:

अक्षय कुडकेलवार

खरंतर निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या प्रत्येक वक्तव्याला महत्त्व असते. त्यातही नेता राज ठाकरेंसारखा असेल तर बात कुछ औरच असते. गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही मनसेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिकेच्या शक्यतांवर बातम्या करत होतो. कधी कुण्या सोर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, कधी इतर पक्षांच्या(कॉंग्रेस, राष्ट्रवादी) सूत्रांकडून मिऴालेल्या इनपुटवरुन तर कधी परस्थितीजन्य रिपोर्टींग करण्यात येत होतं. इकडच्या-तिकडच्या सूत्रांवरून बातम्या करण्याचं कारणही तसंच आहे, एकतर राज ठाकरे हे नवख्या पत्रकारांना सहसा काही इनपूट देत नाही आणि त्याच्या पक्षातील नेते 'याबाबत अंतिम निर्णय साहेब घेतील!' यापलीकडे काही बोलत नाही.

याच परफेक्ट टायमिंग दरम्यान मनसेचा १३ वा वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनाची जाहिरातबाजी करताना 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक असे हेडींग वापरण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाकडे पत्रकार, राजकीय पक्ष आणि पक्षातील सगळ्य़ा नेते-कार्यकर्त्यांच लक्ष लागलं होतं. अर्थात निवडणुकीबात मनसेचा काय स्टँड असेल हे सगळ्यांना राज ठाकरेंच्या तोफमुखातून ऐकायाचे होते. मात्र राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारला धारेवर धरलं. मोदी सरकारच्या विरोधातील राज ठाकरेंच भाषण हे खरोखर मुद्देसुद आणि पुराव्यादखल होतं यात शंका नाही. केंद्रातील विरोधीपक्षनेत्यांच्या भूमिकेला साजेशे किंवा राहूल गांधींच्या तोंडी शोभेल अशा दर्जाचे उत्तम भाषण राज ठाकरेंनी दिले.

मात्र आपल्या पक्षाची जर राजकीय भूमिका ठरली नसेल तर मोदीविरोधातले विचार घेऊन कार्यकर्ते कुणासाठी काम करणार? हा प्रश्न उपस्थित होतो. यावरून राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूकीबाबत भूमिका ठरली नाही असंच दिसतंय. राज ठाकरे जरी पक्षांतर्गत चर्चा सुरु आहे, निवडणूकीबाबतचा निर्णय नंतर घेवू असं सांगत असले तरी लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंचा रस कमीच आहे. लोकसबेबाबत निर्णय जाहीर करायचाच असता तर पक्षाच्या वर्धापन दिनासारखं चालून आलेलं टाईमिंग चुकवण्याइतके राज ठाकरे अपरिपक्व अजिबात नाहीत. कदाचित कालच्या भाषणातून राज ठाकरेंना त्यांच्यातील मोदी सरकार विरोधातल्या 'फायर ब्रांड' व्हॅल्यूकडे आघाडींच्या नेत्यांच लक्ष नव्यानं आकर्षित करायचं असेल. ज्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठीची ध्येय्य धोरणं समोर ठेवून मनसेची स्थापना झाली, तो मराठी माणूस आणि महाराष्ट्र १३व्या वर्धापन दिनाच्या भाषणात कुठेही दिसला नाही.

(लेखात व्यक्त झालेले मत हे लेखकाचं वैयक्तिक मत आहे. त्या मतांशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असे नाही.)

VIDEO राज ठाकरेंचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading