धोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ

धोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघा समोर मोठे आव्हान नव्हते. ३७ वर्षाच्या धोनीने सामना जिंकून दिला हे खरे आहे. पण या सामन्यात त्याने 87 धावांसाठी 144 चेंडू घेतले.

  • Share this:

जसविंदर सिद्धू

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या वनडे मालिकेतील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करताना एक मोठा प्रश्न भारतीय क्रिकेट संघासमोर उभा आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीचा संघात समावेश करणे कितपत तर्कसंगत ठरले?, जर धोनी भारतीय संघात असेल तर मग आक्रमक फलंदाज ऋषभ पंतची संघातील भूमिका काय असेल?. मालिका विजयात धोनीचा वाटा मोठा होता यात कोणतीही शंका नाही. पण असे असले तरी या मालिकेत देखील धोनीची संथ फलंदाजी यावर चर्चा सुरु आहे.

गेल्या 2-3 वर्षातील धोनीच्या फलंदाजीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास याचा अंदाज येतो की त्याचा रिफ्लेक्सेस कमकूवत झाला आहे. याच एका गोष्टीमुळे विरेंद्र सेहवागने निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

धोनी २००४मध्ये वनडे संघात स्थान मिळवले. त्या वर्षी त्याने केवळ 3 सामने खेळले होते. धोनीच्या करिअरची खरी सुरुवात 2005मध्ये झाली. 2005मध्ये त्याने 868 चेंडूत 895 धावा केल्या. 2006मध्ये 821 चेंडूत 883 तर 2007मध्ये 1231 चेंडूत 1103 धावा केल्या होत्या. धोनीच्या या कामगिरीमुळे त्याची ओळख संघातील एक आक्रमक फलंदाज अशी झाली. त्यानंतर देखील धोनीच्या करिअरमध्ये चेंडू आणि धावा यांच्यात फार अंतर राहिले नाही. पण 2015पासून त्याच्या फलंदाजीत संथपणा दिसू लागला. 2015मध्ये धोनीने 737 चेंडूत 640 धावा केल्या. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 2016मध्ये 278 चेंडूत 347 तर 2017मध्ये हे अंतर आणखी वाढले त्याने 930 चेंडूत केवळ 788 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघा समोर मोठे आव्हान नव्हते. ३७ वर्षाच्या धोनीने सामना जिंकून दिला हे खरे आहे. या सामन्यात त्याने 87 धावांसाठी 114 चेंडू घेतले. या वर्षात धोनी ३ वनडे सामने खेळला आहे त्यातील 264 चेंडूत त्याने 193 धावा केल्या आहेत.

यावर आता धोनीची बाजू मांडणारे म्हणतील तो ज्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो त्या ठिकाणी धावा करण्याची फार संधी नसते. पण हा युक्तीवाद न टिकणारा आहे. कारण धोनीने वनडे १० हजार धावा याच क्रमांकावर येऊन केल्या आहेत.

धोनीने आतापर्यंत दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. पण 37 वर्षाच्या धोनीला गेल्या 2 वर्षातील कामगिरीच्या जोरावर विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळवणे कितपत योग्य ठरले हा प्रश्न आहे. विकेटकिपर म्हणून आणि फलंदाज म्हणून देखील ऋषभ पंतने स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे. अशा परिस्थितीत जर विश्वचषकासाठी धोनीला पर्याय म्हणून संघात समावेश झालेल्या पंतला खेळण्याची संधी मिळाली नाही तर तो त्याच्यावर अन्यायच ठरेल.

धोनीचा प्रवास हा भारतीय क्रिकेटसाठी प्रेरणादायकच आहे. रांचीतील सरकारी निवासस्थान ते देशाचा कर्णधार आणि सर्वात मोठा ब्रँड हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. पण केवळ या गोष्टीमुळे सध्याच्या परिस्थितीत धोनीला संघात ठेवणे कितपत योग्य ठरेल. धोनी, संघ व्यवस्थापक आणि निवड समिती यांना निर्णय घेण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे.

'सकाळी फक्त खांदा द्यायला या', आत्महत्येच्या तयारीचा VIDEO टाकला इन्स्टाग्रामवर

First Published: Jan 19, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading