मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

पत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती!

पत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती!

खरंतर MOJO ही पत्रकारिता क्षेत्रात एक नवीन क्रांती आहे. आपण सहज म्हणतो की, आता मोबाईलचा जमाना आहे. तसाच बदल हा MOJO च्या रुपाने येऊ घातला आहे.

खरंतर MOJO ही पत्रकारिता क्षेत्रात एक नवीन क्रांती आहे. आपण सहज म्हणतो की, आता मोबाईलचा जमाना आहे. तसाच बदल हा MOJO च्या रुपाने येऊ घातला आहे.

खरंतर MOJO ही पत्रकारिता क्षेत्रात एक नवीन क्रांती आहे. आपण सहज म्हणतो की, आता मोबाईलचा जमाना आहे. तसाच बदल हा MOJO च्या रुपाने येऊ घातला आहे.

माणसाला तीन मुलभूत गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. त्या म्हणजे अन्न, पाणी आणि निवारा. पण यात आणखी एक घटक जोडला गेला तो म्हणजे मोबाईल फोन. होय, माणसाला मोबाईल किंवा स्मार्टफोन हा या तिन्ही मुलभूत गरजे इतकाच महत्त्वाचा वाटत आहे आणि ते साहजिकच आहे. भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे सर्वाधिक अँड्राईड फोन वापरले जातात. त्यामुळे अँड्राईड युझरची राजधानी म्हणून भारताकडे पाहिलं जातं.  मोबाईल क्षेत्रात झालेल्या बदलाचे परिणाम प्रसारमाध्यमांमध्ये प्रामुख्याने झाले. त्यातूनच मोजो अर्थात मोबाईल जर्नालिझमचा उदय झाला. मोजो म्हणजे काय, पत्रकारांनी याचा कसा वापर करायचा, काय त्याचे फायदे आहे आणि भविष्यात मोजो किती गरजेचा आहे, यावर मोजो आशिया 2019 मध्ये दोन दिवस मंथन झालं.

आशिया खंडातील पहिली मोजो कॉन्फरन्सही बँकाक, थायलंड इथं भरवण्यात आली. पर्यटन हा कणा असलेल्या थायलंडचं ह्रदय असलेल्या बँकाक शहराच्या मध्य परिसरात सुकमोईतो इथं 28 ते 29 दोन दिवशी या कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्या आधी सर्व वक्ते हे 27 तारखेला थायलंडमध्ये पोहोचले होते. या कॉन्फरन्सचं वैशिष्ट म्हणजे जगभरातून वेगवेगळ्या मीडिया हाऊसमध्ये मोबाईलवर आणि मोबाईलचा वापर करणारे असे २८ पत्रकार वक्ते आणि २५० सदस्य सहभागी झाले होते. स्पेन, नेदरलँड, अफगानिस्तान, पाकिस्तान, साऊथ कोरिया, फिलिपाईन्स, श्रीलंका, लंडन, ऑस्ट्रेलिया आणि भारत या वेगवेगळ्या देशातून पत्रकार आले होते. या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे मोजो. मी स्वत: एक मोजो वक्ता म्हणून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालो होतो.

मोजो म्हणजे काय?

मी जेव्हा थायलंडला मोजो कॉन्फरन्स आशिया २०१९ मध्ये सहभागी झालो आणि तिथले काही फोटो हे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अपलोड केले. पोस्ट करताना आम्ही सगळे मोजो म्हणून उल्लेख केला. माझ्यासोबत काम करणारे काही रिपोर्टर आणि स्ट्रिजरर्स यांनी मोजो म्हणजे काय, असा प्रश्न मला विचारला. काहींनी तर येताना मोजो घेऊन या अशी आग्रहाची मागणी सुद्धा केली. पण मुळात मोजो ही संकल्पना वेगळी आहे. मोजो म्हणजे मोबाईल जर्नालिझम. जसं ब्रॉडकास्ट जर्नालिझम, पॉडकास्ट जर्नालिझम, असे वेगवेगळे प्रकार आहे तसाच हा एक नवी पत्रकारितेला ट्रेंड आहे.

मोबाईल अर्थात स्मार्टफोनवर शूट करणे, मोबाईलवरच व्हिडिओ एडीट करणे आणि मोबाईलवरच व्हिडिओ अपलोड करणे म्हणजे मोबाईल जर्नालिझम अर्थात मोजो होय. आपल्याकडे पारंपारिक पद्धतीने टेलिव्हिजन पत्रकारिता केली जाते. एखाद्या घटनेचं वार्तांकन करायचं असेल तर रिपोर्टर हा एक पूर्ण युनिट ज्यामध्ये एक कॅमेरा, कॅमेरामॅन, घटनास्थळी पोहोचण्यासाठी कारचालक असे तिघे पोहोचतात. काही मीडिया हाऊसमध्ये या युनिटसोबत एक प्रोड्यूसरही सोबत असतो. बरं युनिटमध्ये काय असतं तर एक बूम माईक, मोठा कॅमेरा, लेपल माईक, स्लचरल लाईट, मोठा ट्रायपॉड या उपकरणाचा समावेश असतो.  जर महत्त्वाची घडामोड म्हणजे ब्रेकिंग स्टोरी असेल तर याच युनीटमध्ये लाईव्ह यू किंवा ओबी व्हॅनचा समावेश असतो. रिपोर्टर जेव्हा ती घटना कव्हर करतो त्यानंतर फुटेज हे ओबीने किंवा लाईव्ह यू या उपकरणाने आपल्या कार्यालयाच्या एमसीआर टीमकडे पाठवून देतो. त्यानंतर आऊटपूट टीम ही योग्य संस्कार करण्यासाठी जर  पॅकेज तयार करणार असले तर एक जण स्क्रिप्ट राईटिंग करतो, बहुदा रिपोर्टरच स्क्रिप्ट लिहून पाठवून देत असतो. त्यानंतर एक जण व्हाईस ओव्हर करतो आणि व्हिडिओ एडिटर संपूर्ण पॅकेज एडिट करतो. त्यात काही ग्राफिक असले तर ग्राफिक टीम त्यासाठी ग्राफिक तयार करून देते. त्यानंतर एक पूर्ण पॅकेज तयार होते. ही पद्धत सर्वच न्यूज चॅनलमध्ये वापरली जाते. पण MOJO जर्नालिस्ट हा यापासून प्रचंड वेगळा आहे. तो एकटाच MOJO कीट घेऊन फिल्डवर जातो आणि मोबाईलवर शूट करतो, मोबाईलवर एडिट करतो, ग्राफीस हवे असतील तर तेही मोबाईलवरच तयार करतो आणि व्हाईसओव्हर सुद्धा मोबाईलवरच करतो. सर्व काही मोबाईलवरच तयार करून तो मोबाईलवर एफटीपीने किंवा थेट वेबसाईट अथवा सोशल साईटवर अपलोड करतो. हीच पद्धत सध्या MOJO म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील बऱ्याच मीडिया हाऊसमध्ये वापरली जाते. जर आपली पारंपारिक पद्धत पाहिली तर एका स्टोरीसाठी जवळपास ५ ते ६ माणसं काम करतात आणि तिथेच MOJO जर्नालिस्ट हा ५ ही माणसाचं काम एकट्याने करतो, हाच तो सर्वात मोठा बदल.

मोजो आशिया कॉन्फरन्समध्ये मोबाईलवर काम करणारे असेच वेगवेगळ्या न्यूजचॅनलचे 28 पत्रकार आणि 250 सदस्य यात सहभागी झाले होते. या सर्व 28 पत्रकारांच्या जोड्या तयार करून त्यांना वर्कशॉप आणि पॅनलमध्ये सादरीकरण करण्यासाठी सांगितलं होतं आणि प्रत्येकाने जी काही माहिती दिली ती अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभव संपन्न अशीच होती.

पहिल्या दिवशी Conrad adevaner stufting चे डिरेक्टर  Christoph Grabitz यांनी आपल़्या पॅनल डिस्कशनमध्ये MOJO चे पत्रकारितेत स्थान आणि भविष्य काय असेल यावर आपली भूमिका मांडली.  ख्रिस्तोफ म्हणतात की, जगभरात टीव्ही माध्यम हे पारंपारिक पद्धतीने काम करत आहे. ओबी व्हॅन, मोठाले कॅमेरे आणि पत्रकार असं त्याचं स्वरूप आहे. पण आता मोजोच्या रुपाने  नवा बदल हा येऊ घातला आहे. इथं पत्रकार हा अधिक टेक्नोसेव्ही असावा लागतो. त्यामुळे तो एकाच वेळी कॅमेरामॅन, व्हिडिओ एडिटर आणि प्रोड्यूसरची भूमिका बजावत आहे. आशिया खंडात पत्रकारितेचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. वेळीच हा बदल स्विकारणे ही काळाची गरज आहे.

खरंतर भारतीय मीडियाचा विचार केला तर प्रिंट माध्यम हा त्याचा पाया आहे. स्वातंत्र्य पूर्वी काळापासून प्रिंट माध्यमांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. त्यामुळे लोकशाहीचा चौथा खांब म्हणून प्रसारमाध्यमांकडे पाहिलं जातं. इलेक्ट्रॉनिक मीडिया आता कुठे तरूण अवस्थेत आला आहे. मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाला जेमतेम 10 ते 15 वर्ष झाली आहे.  इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या येण्यामुळे प्रिंट माध्यम बंद होतील अशी चर्चा होती आणि आजही हीच चिंता व्यक्त केली जाते. पण दोन्ही माध्यम हे आता वेगवेगळ्या टोकावर पोहोचली आहे आणि भक्कमपणे आपलं अस्तित्व टीकवून आहे. त्यात आता भर पडली आहे डिजीटल मीडियाची.

भारतात NETWORK 18 सह काही वाहिन्यांमध्ये आता MOJO कीटचा वापर सुरू झाला आहे तर काहींनी आधीपासून वापरायला सुरुवात केली आहे. पण मोबाईल हा माध्यमांना हवा हवासा कधी वाटला तो फेसबुक, टि्वटर लाईव्हमुळे...फेसबुक ही मास लिडर सोशल साईट असल्यामुळे तिचा परिणाम लगेच जाणावला. मोठ्या camera वरून Live होऊ शकत नाही, तिथे मोबाईलच वापरला जातो हे जेव्हा आधोरेखित झालं तेव्हा MOJO कीटचा खऱ्या अर्थाने टीव्ही इंडस्ट्रीत जन्म झाला. कुठे नेत्यांची भाषण असो, पत्रकार परिषद असो अशा प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी MOJO कीटने एका संपूर्ण लाखो रुपयांच्या ओबी व्हॅनची जागा बळकावली. हे सगळीकडे घडलंय.  पण भारतात आणि खास करून प्रादेशिक वाहिन्या ज्यांचं आर्थिक गणित जुळून येत नाही त्यांच्यासाठी ही संजिवनी ठरली. त्यांना कळून चुकलं की मोबाईलचा वापर हा कमी खर्चात, कमी मनुष्यबळाचा वापर करून सहज पूर्ण करता येतं.

मोजो कीट कशी अशावी?

साधारणपणे MOJO मधला MO हा मोबाईल आला आहे. त्यामुळे तुम्ही अँड्राईड असो अथवा आयफोन कोणताही फोन वापरू शकतात. पण, प्रत्येक फोनचे हे वेगवेगळे फायदे आणि तेवढे तोटेही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुंताश MOJO रिपोर्टर हे आपल्या कीटमध्ये आयफोनच वापरतात. आयफोनच्या कॅमेऱ्याचं आणि त्याच्या गुणवत्तेचं हे वेगळं समिकरण आहे. आयफोनमधून शूट करणे आणि अँड्राईड फोनमधून रेकाॅर्ड करण्यात बरीच तफावत आहे. त्यामुळे बरेच पत्रकार हे आयफोनला पहिलं प्राधान्य देतात. पण आयफोनची किंमत आवक्याच्या बाहेर असल्यामुळे तो सर्वांनाच घेणे शक्य नाही. त्यामुळे अँड्राईडमधील वरच्या स्तरातील जे अगदी बेसिक अँड्राईड फोन नसतील असे फोन तुम्ही मोजो कीटमध्ये सहज वापरू शकतात.

अ‍ॅप

माझ्याकडे 48MP चा कॅमेऱ्यावाला फोन आहे मग मी काहीही आणि कसंही रेकॉर्ड करू शकतो. असा आपला समज असू शकतो पण जर एखाद्या अॅपमुळे जर तुमचा मोबाईल अगदी डीएसएलआर कॅमेऱ्याप्रमाणे रेकाॅर्ड करायला लागला तर? होय, असं शक्य आहे. FILMICPRO, MAVIS, Movie Pro,Cinema FV-5 सह अनेक असे अॅप आहे ज्यावर तुम्ही उत्तम पद्धतीने शूट करू शकतात.

व्हिडिओ एडिटींग अ‍ॅप

आता मोबाईलवर एडीट कसं करणार? तर अँड्राईडवर अनेक फ्री व्हिडिओ आणि फोटो एडिटींग अॅप  पाहिले असतील आणि वापरले असतील. असेच काही IOS आणि अँड्राईडवर प्रोफेशनल व्हिडिओ एडिडिंग अॅप आहे जे तुम्ही वापरून सहज व्हिडिओ एडिट करू शकतात. त्यामध्ये lumafusion, KineMaster, Adobe Premiere Clip, FilmoraGo,PowerDirector इत्यादी अॅप अँड्राईड आणि IOS वर उपलब्ध असून वापरता येतील. MOJO कीटमध्ये तुमच्याकडे उत्तम आवाज रेकाॅर्ड करण्यासाठी चांगल्या दर्जाचा माईक असणेही गरजे आहे. त्यासाठी BOYA, RODE या ब्रँडचे उत्पादन तुम्हाला बाजारात सहज मिळतील.

खरंतर MOJO ही पत्रकारिता क्षेत्रात एक नवीन क्रांती आहे. आपण सहज म्हणतो की, आता मोबाईलचा जमाना आहे. तसाच बदल हा MOJO च्या रुपाने येऊ घातला आहे. थायलंडमधील 72 वर्षांचे ज्येष्ठ पत्रकार suthichai yoon जे आजही MOJO चा वापर करून स्वत: मिलियन फाॅलोअर्स असलेलं युट्यूब चॅनल चालवतात. suthichai yoon म्हणतात, “Today is difficult, tomorrow is even more difficult, but the day after tomorrow is beautiful. Unfortunately, most people die tomorrow night. So, do not give up, mojo is the bright future. And I’ll see you the day after tomorrow.” बदल हा नियतीचा भाग आहे, जर वेळीच जर स्वीकारला नाहीतर काळ आपल्याला मागे टाकून पुढे जाईल. सध्या स्पर्धेच्या युगात हे तितकंच गरजेचं आहे, असं माझं ठाम मत आहे.

First published: