S M L

World Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....

क्रिकेटच्या पंढरीत होणार्‍या क्रिकेट कुंभमेळ्यासाठी भारतीय संघाची उद्या निवड होत आहे.

संजय दुधाणे संजय दुधाणे | Updated On: Apr 14, 2019 07:12 PM IST

World Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....

मुंबई, 14 एप्रिल : सध्या देशात निवडणूक आणि आयपीएलचे वारे वाहत असले तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांना विश्वचषक स्पर्धेची उत्कंठा लागली आहे. क्रिडाविश्वातील भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार असून भारतीय संघाची घोषणा सोमवारी 15 एप्रिल रोजी होत आहे. त्यामुळं विराट कोहली, एम. एस. धोनी, रोहित शर्मा आणि कोणाची अंतिम 15 संघात वर्णी लागणार याकडे सार्‍या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले आहे.

क्रिकेटच्या पंढरीत होणार्‍या क्रिकेट कुंभमेळ्यासाठी सर्वप्रथम न्यूझीलंडनं आपला संघ जाहीर केला. आता सोमवारी भारताचे शिलेदार सज्ज होतील. विश्वचषकाच्या या मोहिमेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व प्रथमच विराट कोहलीच्या हाती असणार आहे. गत स्पर्धेतील महेंद्रसिंग धोनीसह, सध्या आयपीएल गाजवित असलेला रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणात झुंजताना दिसतील.

वानखेडे स्टेडियमवर 2011 मध्ये हेलिकॉप्टर शॉट मारत, भारताला विजय मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं दुसर्‍यांदा विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं. दरम्यान गत वर्षात धोनीचं नेतृत्व असफल ठरलं. कांगारूंनी उपांत्यफेरीतच आपला रथ रोखला. मात्र, गेल्या चार वर्षांत टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. नव्या दमाच्या खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ यंदाही विजेतेपदाचा दावेदार असल्याचे मत अनेक ज्येष्ठ आणि माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. त्यामुळं टीम इंडिया पुन्हा जोशात विश्वचषकात मैदानात उतरणार आहे.


तर, भारतररत्न सचिन तेंडुलकरचं विश्वचषकाचं स्वप्न साकार करणारा धोनी तिसर्‍यांदा विश्वचषक खेळण्यासाठी करंडकच्या मैदानात दिसणार आहे. दरम्यान, धोनीनं निवृत्त व्हावे, अशी बोचरी टीका सतत होत असताना त्यानं आपण संघासाठी कितपत फायदेशीर आहोत हे ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड दौर्‍यात दाखवून दिले. त्यामुळं धोनी आता चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत चमक दाखविण्यास उत्सुक आहे. तोच संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असल्याने त्याच्यावर संघाची मोठी भिस्त असेल.

मधल्या फळीत धोनीसोबत खेळणाऱ्या पुण्याच्या केदार जाधवनंही आपली संघातील जागा मजबूत केली आहे. त्यामुळं भारतीय निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांच्यासमोर चौथ्या क्रमांकासाठी कोणाला निवडायचे हे मोठे आव्हान आहे. आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा के. एल. राहुल हा चौथ्या स्थानासाठी योग्य खेळाडू असल्याचं मत, लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. तरी कोहलीची  चौथ्या स्थानाकरीता पसंती ही अम्बाती रायडू असण्याची शक्यता आहे. गत विश्वचषकात स्पर्धेचा अनुभव पाठीशी असणारा दिनेश कार्तिकही चौथ्यासाठीचा खेळाडू ठरू शकतो. गेल्या वर्षभरात त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने रायडू किंवा राहुलच्या नावाचा विचार अधिक होण्याची शक्यता आहे. राहुल, कार्तिक आणि ॠषभ पंत हे तिघेही यष्टीरक्षक असल्याने या तिघांपैकी एकाचाच विचार पर्यायी खेळाडू तसेच यष्टीरक्षक म्हणून केला जाणार आहे.

निवड समितीच्या यादीत मुंबईचा पृथ्वीराज शॉ आणि दिल्लीचा जलदगती गोलदांज नवदिप सैनी हे डार्क हॉर्स आहेत. इंग्लंडच्या लहरी हवामानात खेळताना तीन वेगवान, एक फिरकीसह एक अष्टपैलू अशी व्युहरचना विराटची असेल. यासाठी  अष्टपैलू म्हणून पुण्याच्या केदार जाधवचं नावंही पुढं आहे. तर, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड दौरा गाजविणारे यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, जसप्रित बुमराह यांच्यावर मोठी भिस्त असणार आहे.

Loading...

तर, गत स्पर्धेत अजिंक्य रहाणे हा एकमेव मराठमोठा खेळाडू होता. यंदा केदार जाधव हा मराठमोळा क्रिकेटपटू प्रथमच विश्वचषकात भूमीत झळकताना दिसेल. केदारची निवड ही पुण्यासाठी व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकरीता ऐतिहासिक असणार आहे. कारण तो विश्वचषकात खेळणारा पहिलाच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा खेळाडू ठरणार आहे. प्रथमच पुण्याचा चेहरा विश्वकरंडक स्पर्धेत दिसणार आहे. त्यामुळं या संधीचं सोनं करण्यासाठी केदारनंही कंबर कसली आहे. धोनीसोबत मॅचविनरच्या भूमिका तो ब्रिटिश मैदानातही करताना दिसेल. मधल्या फळीतील केदारला विजय शंकरकडून भिती असेल. केदार की शंकर असा पेच निवड समितीला सोडवावा लागणार आहे.

जगभरातील 10 संघांची रणधुमाळी मे महिन्याच्या अखेरीस ब्रिटिशांच्या भूमीत सुरू होईल. 5 जूनला भारताची दक्षिण आफ्रिकेसोबत सलामी लढत असली तरी, पाकिस्तान विरूद्धची झुंजही भारतासाठी अधिक लक्षवेधी ठरणार आहे. 9 संघाविरूध्द लढा देत 14 जुलै रोजी क्रिकेट पंढरी लॉर्डस्वर भारत खेळताना दिसो व कपिल देवप्रमाणे विराटही लॉर्डस्वर विश्वकरंडक उंचविताना दिसेल, त्यापूर्वी संभाव्य 15 खेळाडू कोण याचे उत्तर आपल्या हाती येण्यास काही तासिकाचा राहिल्या आहेत.


संभाव्य टीम इंडिया : विराट कोहली - कर्णधार , रोहित शर्मा - उपकर्णधार, शेखर धवन,  महेंद्रसिंग धोनी - यष्टीरक्षक, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, जसप्रित बुमराह,  मोहम्मद शमी

राखीव : विजय शंकर, ॠषभ पंत, रविंद्र जडेजा / अम्बाती रायडू, दिनेश कार्तिक, के. एल. राहुल



VIDEO : हेमा मालिनींच्या प्रचारासाठी पती धर्मेंद्र मैदानात, ऐकवली भावनिक कविता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 06:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close