मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

...आणि बाळासाहेबांची बातमी आली!

...आणि बाळासाहेबांची बातमी आली!

मातोश्री बाहेर शिवसैनिक मनात रक्त गोठून स्तब्ध उभा होता...डोळ्यात भीती आणि चिंता मन्न सुनं करणारे असचं होतं...दुपारचे तीन वाजले होते...मातोश्रीबाहेर सेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई,एकनाथ शिंदे, मनोहर जोशी शिवसैनिकांना धीर देत होते...

मातोश्री बाहेर शिवसैनिक मनात रक्त गोठून स्तब्ध उभा होता...डोळ्यात भीती आणि चिंता मन्न सुनं करणारे असचं होतं...दुपारचे तीन वाजले होते...मातोश्रीबाहेर सेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई,एकनाथ शिंदे, मनोहर जोशी शिवसैनिकांना धीर देत होते...

मातोश्री बाहेर शिवसैनिक मनात रक्त गोठून स्तब्ध उभा होता...डोळ्यात भीती आणि चिंता मन्न सुनं करणारे असचं होतं...दुपारचे तीन वाजले होते...मातोश्रीबाहेर सेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई,एकनाथ शिंदे, मनोहर जोशी शिवसैनिकांना धीर देत होते...

पुढे वाचा ...

सचिन साळवे, मुंबई

तो दिवस आजही आठवतो...मुळात तो दिवस यायला नकोच होता असा तो दिवस...नोव्हेंबरचा तो महिना होता... दुसऱ्या आठवड्यात दिवाळी होती, सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू होती...पण त्यावेळची दिवाळी ही दिवाळी सारखी मुळीच वाटत नव्हती...अवघ्या मुंबईत चिंतातूर असे वातावरण होते...या चिंतातूर वातावरणात दिवाळी साजरी नावापुरतीच साजरी झाली...आयबीएन लोकमत आजचे न्यूज१८ लोकमतमधील मी आणि माझ्यासारखे सहकारी जे बाहेरगावी राहत होते ते झटपट दिवाळी उरकून मुंबईत परतले होते...तेव्ही नुकताच आयबीएन लोकमतमध्ये जाॅईन झालो होतो..मी मुळचा औरंगाबादचा भाऊबीज उरकल्यानंतर रात्रीच मुंबईला रवाना झालो होतो...मुंबईत येत असताना वाटते अनेक प्रश्नांचे काहुर माजले होते... जेव्हा मुंबईत पहाटे पोहोचलो तेव्हा नेहमी सारखी मुंबई वाटली नाही, सर्वत्र शांतता होती, अहोरात्र जागी राहणारी मुंबई त्या दिवशी पहाटे शांत झोपलेली होती....दादर, लोअर परेल, परळ भागातील दुकानं फारशी कुणी उघडलीच नव्हती...सर्वत्र एकच चर्चा आणि चिंता होती...कुणी देवाला प्रार्थना करत होतं तर कुठे मस्जिदीत नमाज अदा केली जात होती...मुंबई कधी नव्हे ती इतकी शांत आणि स्तब्ध होती...म्हणता ना ही वादळापूर्वीची शांतता आहे...तसंच ते वातावरण होतं..त्या दिवशीचा सुर्योदय उगवला खरा पण त्याची किरणंही बोथट झाली होती...

वांद्र्यात मातोश्री बाहेर शिवसैनिक मनात रक्त गोठून स्तब्ध उभा होता...डोळ्यात भीती आणि चिंता मन्न सुनं करणारे असचं होतं...दुपारचे तीन वाजले होते...मातोश्रीबाहेर सेनेचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, मनोहर जोशी शिवसैनिकांना धीर देत होते...कुणी मीडियाला माहिती देत होते...काळ जसा जसा पुढे जात होता श्वास तितका गुदमरला जात होता...असं वाटत होतं की नको ही पाठशिवणीचा खेळ...अचानक मातोश्रीबाहेर हालचाल वाढली, डॉक्टरांची लगबग वाढली....आमच्या न्यूजरूममध्ये वातावरण कमालीचे अस्वस्थ होते...कानात प्राण ओतून सर्व जण रिपोर्टर, अँकर, न्यूजरूममधील सहकारी टीव्ही स्क्रिनसमोर डोळे लावून होते...मातोश्रीबाहेर नेत्यांची गर्दी वाढली...शिवसैनिकांची एकच गर्दी लोटली... ३.४५ च्या सुमारास डॉक्टर जलील पारकर हे संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांसोबत चालत येत होते...तिथेच पाल चुकचुकली...सर्वत्र एकच शांतता पसरली फक्त डॉ.जलील पारकर यांचाच आवाज ऐकू येत होता...इतकी ती शांतता..."honorable balasheb Thackeray pass away at 3.30..." जलील पारकर यांचे हे शब्द कानी पडताच मन्न धस्स झालं...काय करावे काय करून नये हे काही करायला मार्ग नव्हता...किबोर्डवर बोट वळण्याची थांबली होती...

बाळासाहेब ठाकरे यांचं निधन हे लिहिण्यासाठी ताकद उरली नव्हती...पत्रकाराने कधी भावूक होऊन वार्तांकन नाही केले पाहिजे अगदी तटस्थ राहुन बाजू मांडली पाहिजे...पण तो दिवस आणि तो क्षण वेगळा होता...माझ्यावर एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनाची बातमी कव्हर करण्याची ती पहिलीच वेळ होती... बाळासाहेब नावाचा वादळ डोळ्यापुढे झरकन सरकत होता...काही वेळाने स्वत:ला सावरून बातमी वेबसाईटवर पब्लिश केली...त्यावेळी व्हॉट्सअप वगैरे असा काही प्रकार नव्हता...फेसबुकवर बातमी शेअर करताच ती वाऱ्यासारखी शेअर झाली...

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांच्या अश्रूचा बांध फुटला होता...शिवसैनिक धायमोकळून रडत होते...टीव्ही स्क्रिनवर ही दृश्य पाहून काळजी धस्स झालं होतं...ज्या माणसाच्या शब्दावर जीव ओवाळून टाकणारा सैनिक एखाद्या मुलासारखा रडत होता...परत या परत या बाळाहेब परत या घोषणा तर मन्न अस्वस्थ करणाऱ्या होत्या....

ज्या मुंबईवर बाळासाहेब नावाच्या वादळाने राज्य केलं ती मुंबई या बातमीने गोठली गेली होती...चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते बदालपूर,कर्जत,कसारा पर्यंत सगळं काही स्तब्ध झालं होतं...गर्दीने ओसाडून वाहणारे मुंबईचे रस्ते ओसाड पडले होते...दादर असो, सीएसटी असो किंवा भेंडीबाजार सर्वच ठिकाणी दुकानं बंद झाली होती...महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली होती...

सोशल मीडिया त्यावेळी फेसबुक, वेबसाईटच्या कमेंट बॉक्समध्ये लोकं व्यक्त होतं होते...बाळासाहेबांचे नवे जुने, त्यांच्यासोबत काढलेले फोटो लोकं शेअर करत होते...लाखो शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब सगळ्यांना सोडून गेले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी खुद्द शिवसैनिकाच घेतली होती...अवघा देश बाळासाहेबांच्या जाण्यामुळे हळहळला होता...बाळासाहेब नावाचे वादळ काय होते हे अवघ्या जगाला ठावूक होते.

बाळ केशव ठाकरे असं त्यांचं नाव असलं तरी त्यांची खरी ओळख ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशीच होती. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ…शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख असलेल्या बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात 1950ला ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून झाली. या काळात त्यांची राजकीय व्यंगचित्र खूपच गाजली. पुढे वैशिष्ट्य ठरलेल्या त्यांच्या तिरकस भाषणशैलीचं मुळ त्यांच्या या भुतकाळात आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं एक मोठं नाव. त्यामुळे पुरोगामित्व आणि सामाजिक जाणिवेचा वसा त्यांना घरातूनच मिळाला. शिवसेनेच्या स्थापनेपुर्वी त्यांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा म्हणून मार्मिक या साप्ताहिकाचा उल्लेख करावा लागेल. 1960 साली बाळासाहेबांनी सुरू केलेल्या या व्य्ंागचित्र साप्ताहिकातलं ' वाचा आणि स्वस्थ बसा ' हे सदर तर त्या काळी खूपच गाजलं. या साप्ताहिकानं एक वेगळंच राजकीय वातावरण तयार केलं. 19 जून 1966 साली भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली. 'बजाव पुंगी हटाव लुंगी' ही शिवसेनेची घोषणाही बरीच गाजली.

सुरूवातीला शिवसेनेनं दाक्षिणात्यांना टार्गेट केलं. अनेक कंपन्या आणि व्यवसायात असलेलं दाक्षिणात्यांचं प्राबल्य आणि त्यामुळे मराठी माणसाला होत असलेला त्रास हा प्रमुख मुद्दा शिवसेनेनं हिरीरीनं मांडला. सुरूवातीच्या काळात एक सामाजिक संघटना असलेल्या शिवसेनेचं पुढे राजकीय पक्षात रुपांतर झालं. 1985 नंतरच्या काळात हिंदुत्व आणि राष्ट्रवादाची भूमिका प्रखर करत शिवसेनेनं राजकारणावर भर दिला.

1995 ते 99 हा काळ बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला महत्वाचा काळ म्हणावा लागेल. शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्र विधानसभेत सत्तेवर आलं. आणि बाळसाहेब होते या सरकारचे रिमोट कंट्रोल. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांची अनेक वक्तव्यं वादग्रस्त ठरली. मग त्यात दाक्षिणात्य, गुजराती, बिहारी यांना केलेला विरोध असो, किंवा उघडपणे केलेली हिटलरची प्रशंसा, बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी केलेलं समर्थनाचं विधान असो वा अफझल गुरूच्या संदर्भात तत्कालीन राष्ट्रपती कलाम यांच्यावर केलेली टीका असो बाळासाहेब कायम त्यांच्या अशा वक्तव्यामुळे चर्चेत राहिले. त्यांच्या शब्दांना तलवारीसारखी धार होती. म्हणूनच त्यांच्या वक्तृत्वानं आणि लेखणीनं अनेकांना घायाळ केलं.लाखो तरुणांना शिवसेनेच्या झेंड्याखाली आणलं… महाराष्ट्राचा गेल्या पाच दशकांचा इतिहास लिहायचा झाल्यास बाळासाहेब ठाकरे या आठ अक्षरांना टाळून पुढे जाता येणार नाही. गेल्या पाच दशकात बाळासाहेबांनी अनेक वादळांचा सामना केला. अनेक वाद उभे केले. पण त्यांचा कडवटपणे तितका लढाही दिला.

काही वाद हे पक्षातच निर्माण झाले होते. छगन भुजबळ गणेश नाईक, संजय निरूपम आणि नारायण राणे सारखे नेते शिवसेना सोडून गेले होते. हे बाळासाहेबांना म पटणारे होते. यात सर्वात मोठा धक्का तो आपला पुतण्या राज ठाकरे यांचा होता. उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केल्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. अंगा खांद्यावर खेळलेला राज असं ते जाहीर सभेत सांगून आपली खंतही व्यक्त करत होते. २०११ मधील दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचं शेवटचं भाषण होतं.प्रकृती खालावल्यामुळे बाळासाहेबांच्या भाषणाची चित्रफित दाखवण्यात आली होती.

या भाषणाच्या शेवटी उद्धव आणि आदित्यला मी लादलेले नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगताच उपस्थित तमाम शिवसैनिकांचे हृदय हेलावून गेले होते...तमाम शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांचे ती शेवटची शब्द होती.

बाळासाहेब आज नाहीत, शिवसेना आपल्यापरीने वाटचाल करत आहे, पण ज्यांच्या नावाने सेना ओळखली गेली आणि जाते, ज्यांनी सेनेला मोठं केलं अशा या लढवय्या नेत्यांची आज नववी पुण्यतिथी...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली...

(लेखातले विचार हे लेखकाचं व्यक्तिगत मत आहे. त्या विचारांशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असं नाही.)

First published:

Tags: Shivsena, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना