मुंबई, 24 नोव्हेंबर: इलेक्ट्रिक वाहनं आणि विशेषत: ई कार सध्या जगभरात लोकप्रिय होत आहेत. लोकांना या तंत्रज्ञानावर विश्वास बसत आहे आणि त्यामुळंच अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत लक्षणीत वाढ झाली आहे. परंतु तरीही ई-कार मालकांना सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे कारचं चार्जिंग. भारतात अजूनही चार्जिंग स्टेशनची कमतरता आहे. तसेच या कार चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ ही देखील जगासमोरील मोठी समस्या आहे. पण एखाद्या सामान्य कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात तुमची ई-कार चार्ज होईल, असे कोणी म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? आश्चर्यचकित होऊ नका, हे सत्य आहे. स्विस स्टार्टअप मोरांड हे असेच बॅटरी चार्जिंग तंत्रज्ञान विकसित करत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई-कार अवघ्या 72 सेकंदात चार्ज करू शकता. हे एक हायब्रीड तंत्रज्ञान असेल जे पारंपारिक बॅटरी आणि अल्ट्रा कॅपेसिटर तंत्रज्ञानाचा वापर करेल. अमेरिकन पेट्रोइम इन्स्टिट्यूटच्या मते, पेट्रोल आणि डिझेल कारचा फ्यूल टँक भरण्यासाठी सरासरी दोन मिनिटे लागतात. परंतु इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र या नवीन तंत्रज्ञानामुळं इलेक्ट्रिक हायब्रीड बॅटरी चार्ज करण्यासाठी अर्ध्याहून कमी वेळ लागेल. मोरांडच्या मते, या हायब्रिड तंत्राचा वापर केल्यानं पारंपारिक लिथियम आयन बॅटरीपेक्षा अधिक लाईफ मिळेल. यामध्ये फक्त अल्ट्रा कॅपेसिटर तंत्राचा बदल असेल. मोरंडचे संस्थापक आणि माजी F1 ड्रायव्हर बेनोइट मोरांड यांनी सांगितलं की, सध्या एक प्रोटोटाइप तयार करण्यात आला आहे. सध्यातरी हे तंत्रज्ञान 100 kW पेक्षा जास्त बॅटरी पॅक असलेल्या लाँग-रेंज ईव्हीवर लागू होणार नाही. हे तंत्रज्ञान कार तसेच ड्रोन आणि ई-बाईकसाठी प्रभावी ठरेल. हेही वाचा: Electric Car: काय सांगता! 17 लाखांची Tata Nexon EV फक्त 4.9 लाखांत! कसे वाचतात पैसे? वाचा डिटेल्स 50 हजार वेळा चाचणी केली- मोरांड यांनी सांगितलं की, या तंत्रज्ञानाची 50 हजार टेस्टिंग सेंटरवर चाचणी करण्यात आली आहे. या हायब्रीड तंत्रज्ञानाची आणि पारंपारिक लिथियम आयन बॅटरीसह चार्जिंगची तुलना केली असता, तिची क्षमता खूपच कमी असल्याचं दिसून आलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे तंत्रज्ञान उच्च तापमानातही चांगलं काम करते, जे सामान्यतः पारंपारिक ईव्ही बॅटरीच्या बाबतीत होत नाही. किंमत तुलनेनं महाग - कंपनी आपलं तंत्रज्ञान बाजारात आणण्यासाठी पार्टनर फर्मसोबत काम करत आहे. लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञानापेक्षा ते अधिक महाग असेल. असं असंल तरी हे गेम चेजिंग हायब्रिड तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध होण्यासाठी उत्पादन वाढवण्यावर मोरांडचा भर असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.