जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Electric Car: काय सांगता! 17 लाखांची Tata Nexon EV फक्त 4.9 लाखांत! कसे वाचतात पैसे? वाचा डिटेल्स

Electric Car: काय सांगता! 17 लाखांची Tata Nexon EV फक्त 4.9 लाखांत! कसे वाचतात पैसे? वाचा डिटेल्स

Electric Car: काय सांगता! 17 लाखांची Tata Nexon EV फक्त 4.9 लाखांत! कसे वाचतात पैसे? वाचा डिटेल्स

Electric Car: काय सांगता! 17 लाखांची Tata Nexon EV फक्त 4.9 लाखांत! कसे वाचतात पैसे? वाचा डिटेल्स

Tata Nexon EV: इलेक्ट्रिक कार भविष्यात वर्चस्व गाजवणार आहेत, परंतु सध्या इलेक्ट्रिक कारची किंमत तुलनेनं महाग वाटू शकते. सध्या पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार खूप महाग आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 नोव्हेंबर: अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. भविष्यात इलेक्ट्रिक कारचं वर्चस्व राहणार आहे. परंतु सध्या इलेक्ट्रिक कार खरेदी करणं तुम्हाला महाग वाटू शकतं. सध्या पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार खूप महाग आहेत. देशात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक करा म्हणजे Tata Nexon EV. तिची सुरुवातीची किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे, तर तिच्या पेट्रोल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत सुमारे 7.5 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, जे Tata Nexon EV खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना ती महाग पडू शकते. पण, आज आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक कारवर पैसे कसे वाचवू शकता, हे सांगणार आहोत. चला Tata Nexon XZ+ बद्दल बोलायचं झालं तर तिची एक्स-शोरूम किंमत 16.30 लाख रुपये आहे. तिची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 17.15 लाख रुपये असेल. आता इथून सरकारनं दिलेली सवलत आणि इलेक्ट्रिक कार वापरण्याची किंमत याच्या आधारे तुम्हाला तिची किंमत ठरवता येईल. या कारवर केंद्र सरकार सुमारे 2,99,800 रुपये अनुदान देत आहे. याशिवाय काही राज्य सरकारेही सूट देत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही दिल्लीत असाल तर तुम्हाला दिल्ली सरकारकडून 1.15 लाख रुपयांची सबसिडी मिळेल. आता एकूण सूट 4,14,800 रुपये झाली आहे. हेही वाचा:   Mahindra Thar मॉडिफाय करणं पडलं महागात, न्यायालयानं सुनावली 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा आता या एकूण सूटीनंतर, कारची ऑन-रोड किंमत 13 लाख रुपयांच्या जवळपास असेल. दुसरीकडे, तुम्ही कारवर कर्ज घेतल्यास, तुम्हाला कर्जाच्या व्याजावर दीड लाख रुपयांपर्यंतची सूटही मिळू शकते. म्हणजेच 13 लाख रुपयांमधून आणखी दीड लाख रुपये वजा केले गेले जातील. त्यामुळे आता तिची किंमत सुमारे 11.5 लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

कार खरेदी केल्यानंतर ती चालवण्याच्या खर्चात मोठी बचत होते. टाटा नेक्सॉनच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या बचत कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही कार दररोज 70 किलोमीटर चालवली आणि पेट्रोलची किंमत 100 रुपये असेल, तर तुम्ही पाच वर्षांत सुमारे 6.6 लाख रुपयांची बचत करू शकता. आता या 11.5 लाख रुपयांमधून 6.6 लाख रुपये वजा केले तर ही कार तुमचे 4.9 लाख रुपये वाचवेल. थोडक्यात ही कार घेणं तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात