नवी दिल्ली, 11 जानेवारी : आता व्हॉट्सपच्या प्रायव्हसीबाबत (privacy of whats app) अजून एक नवीनच धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स आता गुगल सर्च रिजल्टमध्ये (google search result) दिसत आहेत असा दावा सायबर सिक्युरिटीचे अभ्यासक राजशेखर राजहरिया यांनी केला आहे.
या गोष्टीचा अर्थ असा, की आता कुणीही केवळ गूगल सर्च करून खासगी व्हॉट्सअप ग्रुप (private whats app group) सर्च करू शकतो. एवढंच नाही, तर त्यात सहभागीही होऊ शकतो. याआधी 2019 मध्येही अशाच गोष्टी समोर आल्या होत्या. यानंतर कंपनीनं ही चूक सुधारली होती. याशिवाय आता लोकांच्या पर्सनल व्हॉट्सअप प्रोफाईल्ससुद्धा सर्च रिजल्टमध्ये दिसत आहेत. यामुळं केवळ एका सर्चमुळं अनेकांचे फोन नंबर आणि प्रोफाईल फोटोही (profile photo) दिसत आहेत.
ग्रुप चॅट इंडेक्सिंगची (group chat indexing) परवानगी देत व्हॉट्सप आता आपल्या वेबवर अनेक प्रायव्हेट ग्रुप उपलब्ध करून देतो आहे. त्यांच्या लिंक्स गुगलवर केवळ एक सर्च देत मिळवता येतात. काही रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार ज्याला ही लिंक मिळते, तो केवळ ग्रुपमध्ये सहभागी होतो असं नाही, तर त्याला ग्रुप मेम्बर्सचे पोस्ट आणि फोन नंबरपण दिसतात. सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरीया यांनी याबाबत माहितीही दिली होती. आता अजवळपास 1500 होऊन अधिक ग्रुप इन्वाइट लिंक गुगलवर उपलब्ध आहेत.
गुगलद्वारा दिले गेलेले काही लिंक्स पॉर्न शेअर करणाऱ्या व्हॉट्सप ग्रुपच्याही आहेत. इतर काही केसेसमध्ये काही विशिष्ट विचारधारांना पुरस्कृत करणाऱ्या ग्रुपच्या या लिंक्स होत्या. याशिवाय बंगाली आणि मराठी युजर्ससाठी मेसेज शेअर करणाऱ्या लिंक्सही तिथे सापडल्या. रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअप युजर्सची प्रोफाईलही गुगलवर उपलब्ध झाल्या आहेत. आधीच 5000 प्रोफाईल्स तिथे दिसतात. व्हॉट्सअपच्या डोमेनवर कंट्री कोड शोधून लोकांच्या प्रोफाईल्सच्या युआरएल समोर येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Whats app group, Whats app news