मुंबई, 17 नोव्हेंबर: अलीकडच्या काळात देशामध्ये कारच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळं अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. परंतु तरीही डिझेल आणि पेट्रोल कारच्या मागणीत घट झालेली नाही. उलट ही मागणी आणखी वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन विविध कार कंपन्या येत्या काळात तब्बल 21,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. परंतु तरीही मागणी आणि प्रत्यक्ष निर्मिती यात फरक मोठा आहे. त्यामुळं अनेक वाहनांवर तब्बल 22 महिन्यांपर्यंत वेटिंग आहे. सध्या आठ लाखांहून अधिक गाड्यांची डिलिव्हरी बाकी आहे. त्यामध्ये 99 टक्के मागणी ही पेट्रोल-डिझेल कारसाठी आहे.
मोठ्या प्रमाणात वाढली एसयूव्हीची मागणी:
अलीकडच्या काळात स्पोर्ट यूटिलिटी व्हेईकल अर्थात एसयूव्हींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये महिंद्रा आणि टाटाच्या एसयूव्हींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
महिंद्रा पुढील दोन वर्षभरामध्ये एसयूव्हीचं उत्पादन 6 लाख वाहनांपर्यंत नेणार आहे. सध्या कंपनी प्रत्येक वर्षी 3 ते 3.50 लाख एसयूव्ही तयार करते. कंपनीनं उत्पादन क्षमता वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं असून येत्या काळात त्यासाठी 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
हेही वाचा: टोयोटाची पहिली CNG कार लाँच, काय आहे किंमत? वाचा सविस्तर
दुसरीकडे टाटा मोटर्सच्या वाहनांची मागणी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाटा मोटर्सनं आपली उत्पादन क्षमता सहा लाखांहून नऊ लाखांपर्यंत वाढवण्याचं ध्येय्य ठेवलं आहे. यासाठी कंपनी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
देशातील सर्वाधिक कारची विक्री करणारी मारूती सुझुकीसुद्धा हरयाणामध्ये नवीन प्लांट सुरु करणार आहे. कंपनीनं यासाठी सात हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
इलेक्ट्रिक कारची विक्री फक्त 1 टक्के:
अलीकडच्या काळात अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतातही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. मात्र यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा तुलनेनं कमी आहे.
एप्रिल-सप्टेंबर महिन्यात देशामध्ये 19,36,740 कारची विक्री झाली. यामध्ये 18,142 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. म्हणजेच पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत ही विक्री केवळ 0.93 टक्के आहे.
या कंपनीच्या कार्सना सर्वाधिक वेटींग-
मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा एण्ड महिंद्रा, किया मोटर्स, ह्युंदाई, टोयोटा या कंपन्याच्या कारला मोठी मागणी आहे. त्यामुळं या कारला मोठं वेटिंग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Electric vehicles, Maruti suzuki cars