जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / टोयोटाची पहिली CNG कार लाँच, काय आहे किंमत? वाचा सविस्तर

टोयोटाची पहिली CNG कार लाँच, काय आहे किंमत? वाचा सविस्तर

देशातील पहिली Toyota Glanza CNG कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील पहिली Toyota Glanza CNG कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली पहिली सीएनजी कार टोयोटा ग्लँजा (Toyota Glanza CNG) भारतीय बाजारात लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टोयोटा ग्लांझा सीएनजीची चर्चा सुरू होती. अखेर ही कार बाजारात आली असून, कंपनीने कार लाँच केल्यानंतर बुकिंगही सुरू केलंय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 नोव्हेंबर: टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली पहिली सीएनजी कार टोयोटा ग्लँजा (Toyota Glanza CNG) भारतीय बाजारात लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टोयोटा ग्लांझा सीएनजीची चर्चा सुरू होती. अखेर ही कार बाजारात आली असून, कंपनीने कार लाँच केल्यानंतर बुकिंगही सुरू केलंय. मारुती सुझुकी बलेनोवर ला स्पर्धा देणारी, ही प्रीमियम हॅचबक कार लेटेस्ट फीचर्ससह आली आहे. या कारची स्पेसिफिकेशन, मायलेज, फीचर्स आणि किमतीसह सर्व गोष्टी जाणून घेऊयात. पॉवर आणि स्पेसिफिकेशन्स- पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत Toyota Glanza CNG मध्ये आधीप्रमाणेच 1.2 लीटर के-सीरिज इंजिन देण्यात आलंय. ते सीएनजी मोडमध्ये 77.5PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. तर, पेट्रोल मोडमध्ये असताना त्याची पॉवर 90PS आहे आणि टॉर्क 113NM आहे. Glanza CNG मध्ये ग्राहकांना फक्त मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय मिळत आहे. तुम्ही पेट्रोल व्हेरियंट विकत घेतल्यास, तुम्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोनपैकी एक निवडू शकता. मायलेज- Toyota Glanza CNG प्रतिकिलो 30.61 किमी मायलेज देते. तर पेट्रोल मॉडेल 22.35 किमी आणि ऑटोमॅटिक मॉडेल 22.94 किमी मायलेज देते. हेही वाचा: Toyotaने भारतात अर्बन क्रूझर का बंद केली? वाचा कारण फीचर्स- टोयोटा ग्लान्झा सीएनजीमध्ये नवीन अलॉय व्हील आणि स्प्लिट टेल लाईट मिळतात. याशिवाय एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, एलईडी फॉग लॅम्प, 7-इंच स्मार्ट प्लेकास्ट प्रो टच इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, टेलिस्कोपिक अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हील आणि 6 एअरबॅग्ज या फीचर्स ग्राहकांना या कारमध्ये मिळतील.

    News18लोकमत
    News18लोकमत

    व्हेरियंट आणि किंमत- Toyota Glanza CNG S MT ची एक्स शोरूम कीमत 8.43 लाख रुपये आहे. तर, Toyota Glanza CNG G MT ची किंमत 9.46 लाख रुपये आहे.मागच्या काही काळात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे सीएनजी कारची क्रेझ पूर्वीपेक्षा वाढली आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कारचे नवीन सीएनजी व्हेरियंटही लाँच केले आहेत. याशिवाय, कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे सीएनजी व्हेरियंट लवकरच बाजारात येऊ शकतात, असं म्हटलं जातंय. यामध्ये मारुती सुझुकी ब्रेझा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर सीएनजी सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: car
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात