नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग साइट्सनी आता सेल सुरू केले आहेत. फ्लिपकार्टचा सेल तर आजपासूनच (6 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. व्हॅलेंटाइन्स डेसाठी शॉपिंग करण्याची इच्छा असेल, तर या सेल्सचा नक्कीच लाभ घेता येईल. फ्लिपकार्टच्या आजपासून सुरू झालेल्या सेलमध्ये सगळ्यात उत्पादनांवर भरपूर सवलत देण्यात आलीय. अॅपलच्या एअरपॉड्सवर असलेली सवलत ऐकून तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल. कारण एरव्ही प्रचंड महाग असलेले हे एअरपॉड्स या सेलमध्ये तुम्हाला चक्क 999 रुपयांमध्येही विकत घेता येतील. त्यासाठी काय ऑफर आहे, हे जाणून घेऊ या. याबाबतचं वृत्त 'टीव्ही 9 हिंदी'ने दिलं आहे.
यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त आता ऑनलाइन शॉपिंग साइट्सनी सेल्स सुरू केले आहेत. फ्लिपकार्टचा सेल आजपासून (6 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. हा सेल 12 तारखेपर्यंत म्हणजे यापुढे 7 दिवस असणार आहे. यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला तुम्ही अॅपलचे एअरपॉड्स भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टचा सेल खूपच फायदेशीर ठरेल. अॅपल एअरपॉड्स प्रोवर या सेलमध्ये मोठी सवलत आहे.
हेही वाचा - DDLJ चे शाहरुख खान होऊ नका; एखादीला प्रपोज करताना या 5 गोष्टी लांबच ठेवा!
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये खरं तर अॅपलच्या एअरपॉड्सची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. मात्र Flipkart Flip Heart Days Sale या सेलमध्ये या एअरपॉड्सवर 19 हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफर दिली जातेय. या एक्स्चेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमचा जुना मोबाइल फोन द्यावा लागेल. हा जुना फोन एक्स्चेंज करताना त्याची पूर्ण एक्स्चेंज व्हॅल्यू मिळाली, तर तुम्हाला हे इअरबड्स केवळ 999 रुपये किमतीत मिळू शकतील. म्हणजेच 19 हजार 999 रूपयांच्या एअरपॉड्सच्या किमतीतून मोबाइलच्या एक्स्चेंजची 19 हजार रुपयांची किंमत कमी केली तर अॅपलचे एअरपॉड्स केवळ 999 रुपयांना मिळू शकतील. पेटीएम कॅश वॉलेटचा वापर केल्यास तुम्हाला आणखी 100 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच हे एअरपॉड्स केवळ 899 रुपयांना मिळतील.
ज्या ग्राहकांना जुना मोबाइल एक्स्चेंज करायचा नाही, त्यांना काही सुलभ हफ्ते भरून हे एअरपॉड्स विकत घेता येतील. मासिक 2223 रुपयांचा हफ्ता असेल. त्यासाठी व्याजही आकारण्यात येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीनं हे एअरपॉड्स विकत घेता येतील. व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या ऑफर्स ग्राहकांना मिळतील. त्याशिवायही इतर उत्पादनांवर काही सूट व सवलती देण्यात आलेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Flipkart, Technology