मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /फोनमध्ये 'ही' चार अ‍ॅप असतील तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान

फोनमध्ये 'ही' चार अ‍ॅप असतील तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल मोठं नुकसान

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मालवेअरने संक्रमित 4 फाइल ट्रान्सफर करणारी अ‍ॅप्स शोधली आहेत. ती अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक आहेत, जे तुम्हाला अडचणीत आणू शकतात

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 6 नोव्हेंबर : फ्रेंड सर्कलमध्ये एखाद्याच्या फोनचा कॅमेरा चांगला असेल, तर त्याच फोनमध्ये फोटो काढले जातात. नंतर त्याच्याकडून बाकीचे फोटो घेतात. अशाच प्रकारे फोटो, व्हिडिओ किंवा इतर फाइल्सची देवाण-घेवाण होते. एका फोनमधून दुसऱ्या फोनवर फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी युजर्स मीडिया शेअरिंग अ‍ॅप्स वापरतात. गुगल प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप्स ज्यांचा वापर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. मात्र, अशी काही अ‍ॅप्स आहेत जी तुमच्या नकळत तुमचा पर्सनल डेटा चोरतात.

    रिपोर्ट्सनुसार, मालवेअरने संक्रमित 4 फाइल ट्रान्सफर करणारी अ‍ॅप्स शोधली आहेत. ती अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक असून, युजर्सची माहिती चोरतात. त्यामुळे युजर्सनी ती अ‍ॅप्स लगेच आपल्या फोनमधून डिलीट करायला हवीत.

    चार मालवेअरने संक्रमित ही चारही अ‍ॅप्स किमान एक मिलियन वेळा डाउनलोड केली गेली आहेत. मालवेअर ब्लॉग पोस्टनुसार, अ‍ॅप डेव्हलपर मोबाइल अ‍ॅप्स ग्रुपमध्ये 4 संशयास्पद अ‍ॅप्स गुगल प्लेवर लिस्टेड आहेत. ही चारही अ‍ॅप्स अँड्रॉइड ट्रोजन हिडनअ‍ॅड बीटीजीटीएचबीने संक्रमित आहेत. त्यांच्या जुन्या व्हर्जनमध्ये यापूर्वी Android/Trojan.HiddenAds च्या विविध व्हेरियंटचं संक्रमण आढळलं होतं. असं असूनही, ही अ‍ॅप डेव्हलपर अजूनही गूगल प्लेवर आहेत.

    कोणती आहेत ती चार अ‍ॅप्स

    ब्लूटूथ ऑटो कनेक्ट (Bluetooth Auto Connect)

    ब्लूटूथ अ‍ॅप सेंडर (Bluetooth App Sender)

    ड्रायव्हर: ब्लूटूथ, वाय-फाय, यूएसबी ( Driver: Bluetooth, Wi-Fi, USB)

    मोबाइल ट्रान्सफर: स्मार्ट स्विच (Mobile transfer: smart switch)

    या अ‍ॅप्समध्ये हिडन अ‍ॅड्सच्या विविध प्रकारांचा संबंध असल्याचं आतापर्यंत अनेकदा उघड झालंय. त्यामुळे युजर्स यापैकी कोणतंही अ‍ॅप वापरत असल्यास ते त्यांनी तत्काळ डिलीट करायला हवं.

    ब्लॉग पोस्टनुसार, फोन लॉक असतानाही ही अ‍ॅप्स Google Chrome मध्ये फिशिंग साइट उघडतात. युजरने फोनचं लॉक उघडताच, ही अ‍ॅप्स त्यांना नवीन धोकादायक साइटसह नवीन टॅबवर घेऊन जातात. यानंतर एक नवीन साइट उघडते आणि टॅब आपोआप पुन्हापुन्हा उघडत राहतात.

    या अ‍ॅप्समध्ये अटॅक करण्यासाठी अनेक प्रकारचे मालवेअर असतात. या पैकी काही मालवेअर युजर्सचा डेटा चोरण्यासाठी नवीन युक्त्या वापरत असतात. याशिवाय ते डेटा चोरून पे पर क्लिकच्या माध्यमातून पैसे कमवतात. त्यामुळे अशा अ‍ॅप्सपासून सावध राहायला हवं.

    First published:

    Tags: Mobile, Tech news, Top trending, Whatsaap