मुंबई, 5 सप्टेंबर: तुम्हाला दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्यास, तुम्ही विविध बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFCs) ऑफरचा लाभ घेऊ शकता. परंतु कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, व्याजदर तसेच कर्जाच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासा. स्टार्टअप कंपनी ओटीओचे सीईओ सुमित छाजेड हे टू व्हीलर फायनान्स करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली आहे. दुचाकीसाठी कर्ज घेण्यासाठी पात्रता- टू व्हीलर लोन घेण्यापूर्वी तुम्ही त्याच्याशी संबंधित मूलभूत अटी आणि पात्रता तपासली पाहिजे. दुचाकी कर्ज घेण्यासाठी भारताचे रहिवासी असणं आवश्यक आहे. तसेच, निवासी पत्ता देखील येथे असावा. कर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावं. काही कर्ज देणाऱ्या बँका किंवा बिगर बँकिंग कंपन्या 18 ते 20 वयोगटातील लोकांना कर्ज देत असल्या तरी, त्यासाठी सह-अर्जदार असणं आवश्यक आहे. याशिवाय, कर्जदाराकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यास, त्याचा एक्सपेरियन क्रेडिट स्कोर 600 ते 650 च्या दरम्यान असावा. उत्पन्नाची स्थिती- कर्ज देण्यापूर्वी बँका किंवा बिगर बँकिंग कंपन्या प्रथम उत्पन्न आणि नोकरीची स्थिती तपासतात. पगार ३० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज मिळणं सोपं असतं. कर्ज पास होण्यासाठी किमान 3 महिन्यांची पगार स्लिप देखील आवश्यक आहे. स्वयंरोजगार म्हणजेच स्वयंरोजगार असलेल्या लोकांना 6 महिन्यांची बचत स्लिप मागितली जाते. काही विशेष प्रकरणांमध्ये, महिन्याला 10 ते 12 हजार रुपये कमावणाऱ्या लोकांना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही दिले जाते. कर्ज प्रक्रिया- आजकाल बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या पेपरलेस कर्ज प्रक्रिया करतात. परंतु कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही कर्ज देणाऱ्या बँकेकडून कंपनीची संपूर्ण माहिती घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी, कर्ज प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. हेही वाचा- CNG Cars: सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ कार आहेत बेस्ट ऑप्शन कर्जाचा कालावधी- साधारणपणे दुचाकीचं कर्ज 1 ते 3 वर्षांचं असतं. काही बँका किंवा NBFC तुम्हाला 4 किंवा 5 वर्षांसाठी कर्ज देऊ शकतात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टू-व्हीलरचं कर्जही 6 महिन्यांत फेडू शकता. लोन टू व्हॅल्यू प्रमाण (LTV) - बहुतेक वित्तीय संस्था टू व्हीलर लोनवर लोन टू व्हॅल्यू (LTV) प्रमाण 90 ते 95 टक्के कर्ज देतात. यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचं क्रेडिट प्रोफाइल महत्त्वाचं असतं. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही त्या बँक किंवा NBFC चे LTV प्रमाण तपासलं पाहिजे. कर्ज कोणतंही असो, कर्ज घेण्यापूर्वी, ते सहज फेडता येतं की नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कर्ज व्याज दर- कोणत्या व्याजदरानं कर्ज दिलं जात आहे, ते तपासलं पाहिजे. साधारणपणे दुचाकी कर्ज 8-10 टक्के व्याजानं दिलं जातं. अशा परिस्थितीत, तुम्ही अनेक वित्तीय संस्थांद्वारे देऊ केलेल्या दुचाकी कर्जाकडे लक्ष द्या आणि त्याच विश्वसनीय संस्थेकडून कर्ज घ्या जिथे तुम्हाला कमी व्याजदरानं कर्ज मिळतं. अतिरिक्त शुल्क- अनेक वित्तीय संस्था कमी व्याजानं कर्ज देण्याविषयी बोलतात, परंतु अतिरिक्त शुल्काबाबत सांगत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्ही कर्जाच्या सर्व अटी, शर्ती, विलंब शुल्क, प्रक्रिया शुल्क आणि बाऊन्स चार्जेसची अचूक माहिती घ्यावी. विशेष ऑफर- सणासुदीच्या काळात बँका आणि NBFC कडून अनेक खास ऑफर असतात. काहीवेळा दुचाकी निर्माते फायनान्सिंगशी संबंधित विशेष ऑफर देखील देतात. या सर्व ऑफर्स तपासल्यानंतर तुम्ही कर्ज घेण्याचं ठरविलं तर तुम्हाला फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.