जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / दोन इंजिनिअर्सची कमाल, पेट्रोल वाहनांना बनवताए इलेक्ट्रिक, एकदा चार्ज केल्यावर चालते तब्बल 150 किमी

दोन इंजिनिअर्सची कमाल, पेट्रोल वाहनांना बनवताए इलेक्ट्रिक, एकदा चार्ज केल्यावर चालते तब्बल 150 किमी

दोन इंजिनिअर्सची कमाल, पेट्रोल वाहनांना बनवताए इलेक्ट्रिक, एकदा चार्ज केल्यावर चालते तब्बल 150 किमी

इनक्यूबेटेड स्टार्टअप सीबीएस फ़्लिवर प्राइवेट लिमिटेड असे स्टार्टअपचे नाव आहे.

  • -MIN READ Local18 Kota,Rajasthan
  • Last Updated :

शक्ति सिंह, प्रतिनिधी कोटा, 16 जुलै : राजस्थान राज्यातील कोटा येथील दोन इंजिनिअर्सने एक स्टार्टअप सुरू केले आहे. शुभम शर्मा आणि अर्पिता शर्मा अशी त्यांची नावे आहे. वाढते इंधनदर पाहता त्यांनी पेट्रोल, डिझेल वाहनाला इलेक्टिक हायब्रिड वाहनात कनव्हर्ट करणे सुरू केले आहे. नुकतीच त्यांनी टाटा कंपनीची पेट्रोल नॅनो कारला इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट केले आहे. ही कार 3 ते 4 तास फुल चार्ज केल्यानंतर 100 ते 150 किमीपर्यंत चालते. तसेच ही कार प्रतितास 60 ते 70 किमीच्या वेगाने चालेल. इनक्यूबेटेड स्टार्टअप सीबीएस फ्लिवर प्राइवेट लिमिटेड असे स्टार्टअपचे नाव आहे. त्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींपासून सर्वसामान्यांची सुटका व्हावी, यासाठी हा पर्याय शोधून काढला आहे. यामध्ये ते पेट्रोल, डिझेल वाहनाला इलेक्टिक हायब्रिड वाहनात कनव्हर्ट करत आहेत. हायब्रिड वाहन म्हणजे तुम्ही तुमच्या वाहनाला पेट्रोल, डिझेलसोबत इलेक्ट्रिक स्वरुपातही चालवू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

कंपनीच्या फाऊंडर अर्पिता शर्मा यांनी सांगितले की, एक नवीन इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये 15 ते 20 लाख रुपयांत मिळते. मात्र, वाहनाला इलेक्ट्रिक वाहनात कन्हर्ट करण्यात फक्त 20 लाखांच्या 10 टक्के खर्च येतो. यानंतर गाडीची रनिंग कॉस्ट आणि मेंटनन्स 0 होऊन जाते. यामुले लोकांना वाहनाला चालवणे सोपे होऊन जाते.

नुकतेच त्यांनी एका टाटा नॅनोला इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट केले आहे. याचा वेग 60 ते 70 किमी प्रतितास असून एकदा फुल चार्ज केल्यावर ती 100 ते 150 किमी चालते. त्या पुढे म्हणाल्या की, कंपनीने यामध्ये एका राखीव बॅटरीची सोय केली आहे. यामध्ये एक बॅटरी संपल्यानंतर तुम्ही 50 किमीच्या आत कुठेही जाऊ शकतात. तसेच वाहनाला पुन्हा चार्ज करुन पुढचा प्रवास करू शकतात. 3 ते 4 तासांत या बॅटरीला फुल चार्ज केले जाऊ शकते. तसेच यामध्ये जास्तीत जास्त 5 लोक प्रवास करू शकतात. यासोबतच वाहनात एसी चालू करण्याची सोयही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात