कंपनीनं सप्टेंबर 2020मध्ये मारुती विटारा ब्रेझाचं नवीन व्हेरियंट अर्बन क्रूझर बाजारात आणलं. भारतात या कारचे 65,000 पेक्षा जास्त युनिट्स विकले गेले आहेत. कंपनीनं सांगितलं की ग्राहकांना आणखी समाधानी करण्यासाठी ग्राहकांच्या फीडबॅकवर आधारित मॉडेल्स आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
टोयोटानं म्हटलं आहे की, 'या क्रमाने आम्ही टोयोटा अर्बन क्रूझर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की भारतातील सध्याच्या मजबूत आणि टिकाऊ उत्पादनांच्या मदतीने आम्ही बाजाराच्या गरजा पूर्ण करू शकू.
कंपनीच्या वतीनं असं सांगण्यात आलं की, अर्बन क्रूझरनं अनेकांना टोयोटा वाहने पहिल्यांदाच खरेदी करण्यास प्रेरित केले, विशेषत: द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या बाजारपेठेत आणि त्यामुळे कंपनीला नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
टोयोटाने अलीकडेच Glanza आणि Urban Cruiser Hyrider च्या नवीन प्रकारांसह CNG श्रेणीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की Glanza च्या दोन CNG मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 8.43 लाख आणि 9.46 लाख रुपये आहे. मात्र, कंपनीने अर्बन क्रूझर हायरायडरच्या सीएनजी मॉडेलची किंमत जाहीर केलेली नाही.
टोयोटाच्या सेल्स अँड स्ट्रॅटेजी मार्केटिंगचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले की, ग्राहक-केंद्रित कंपनी असल्यानं ग्राहकांचे हित अग्रस्थानी ठेवण्यावर कंपनीचा विश्वास आहे. "ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांना सर्वात प्रॅक्टिकल उत्पादने आणि सेवा प्रदान करून बाजाराच्या गरजा पूर्ण करणे हे टोयोटाचं नेहमीच ध्येय राहिले आहे”, असं ते म्हणाले.