जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / TUCO : टोयोटानं सुरू केलं युज्ड कार आउटलेट; आता वॉरंटीसह खरेदी करा कंपनीच्या Second Hand Car

TUCO : टोयोटानं सुरू केलं युज्ड कार आउटलेट; आता वॉरंटीसह खरेदी करा कंपनीच्या Second Hand Car

टोयोटाने सुरु केलं युज्ड कार आउटलेट, वॉरंटीसह खरेदी करा कंपनीच्या सेकंड हँड कार

टोयोटाने सुरु केलं युज्ड कार आउटलेट, वॉरंटीसह खरेदी करा कंपनीच्या सेकंड हँड कार

Toyota Used Car Outlet: टोयोटा किर्लोस्कर मोटरने (Toyota Kirloskar Motors) आपले टोयोटा युज्ड कार आउटलेट (TUCO) लाँच केलं आहे. या आउटलेटमध्ये ग्राहकांना वापरलेल्या कार (Second Hand Car) विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसह पुरवल्या जातील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै: टोयोटा किर्लोस्कर मोटरनं (Toyota Kirloskar Motors) आपलं टोयोटा युज्ड कार आउटलेट (Toyota Used car outlet- TUCO) लाँच केलं आहे. हे आउटलेट बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आलं आहे. ज्यांना टोयोटाकडून वापरलेली किंवा सेकंड हँड कार खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन प्रदान करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीचा दावा आहे की, या आउटलेटमध्ये ग्राहकांना वापरलेल्या कार (Second Hand Car) विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसह पुरवल्या जातील. त्यामुळं सेकंड हँड गाड्या घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. TUCO च्या माध्यमातून, Toyota भारतातील यूज्ड कार सेगमेंट विभागात (Used Car Segment) प्रवेश करत आहे. भारतात, गेल्या काही वर्षांत या विभागात बरीच वाढ झाली आहे. TUCO च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टोयोटा कार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. यामध्ये ग्राहक परवडणाऱ्या किमतीत विश्वसनीय कामगिरीसह या ब्रँडच्या कार खरेदी करू शकतात. विश्वसनीयतेसह उपलब्ध करून दिल्या जाणार कार- टोयोटा किर्लोस्करचे व्हाईस चेअरमन विक्रम किर्लोस्कर म्हणाले, “भारतातील युज्ड कार मार्केट दरवर्षी झपाट्याने वाढत आहे आणि टोयोटा युज्ड कार आऊटलेट्स आमच्या ग्राहकांना विश्वासार्हतेसह वाजवी दरात आणि पारदर्शकतेसह कार उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा भाग आहे.” हेही वाचा:  Aadhaar Cardला लिंक केलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स खरेदी करणंही आहे सुलभ- कंपनीनं म्हटलं आहे की, “आमचे लक्ष आमच्या ग्राहकांना सुविधा, पारदर्शकता आणि उत्तम दर्जाच्या नूतनीकरण केलेल्या कार देण्यावर असेल. आम्ही विश्वासार्ह आणि पारदर्शकतेसह वापरलेल्या कारचे मार्केट तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामुळे खरेदीदारांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार कार खरेदी करणे सोपे होईल.” फायनान्स सुविधाही होणार उपलब्ध- TUCO मध्ये अशा टोयोटा वाहनांचा समावेश असेल, ज्यांची पूर्ण चाचणी केली गेली आहे आणि ती सर्व आवश्यक कागदपत्रांसह विकली जातील. वाहनाचा संपूर्ण इतिहास पुढील ग्राहकाला दिला जाईल. याशिवाय कंपनीकडून या कार्सवर अतिरिक्त वॉरंटी आणि मूल्यवर्धित सेवाही दिली जाणार आहे. TUCO नवीन मालकाला RTO सहाय्यासह फायनान्स सुविधा देखील प्रदान करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात