Home /News /auto-and-tech /

Top 5 Electric Scooters in India: काय सांगता! 70 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळतात ‘या’ 5 ई-स्कूटर्स, 122 किमींची तगडी ड्रायव्हिंग रेंज

Top 5 Electric Scooters in India: काय सांगता! 70 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळतात ‘या’ 5 ई-स्कूटर्स, 122 किमींची तगडी ड्रायव्हिंग रेंज

Top 5 Electric Scooters in India: आज आपण अशा 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सची माहिती घेणार आहोत, ज्यांची किंमत 70 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्कूटर्सची ड्रायव्हिंग रेंजही चांगली आहे.

    मुंबई, 3 ऑगस्ट: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. अलीकडच्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सातत्यानं प्रोत्साहन दिल्यानं लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. या यादीत अशा इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची किंमत 70 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यापैकी कोणती स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते, हे आज आपण जाणून घेणार आहोत. 1. ओकिनावा रिज प्लस (Okinawa Ridge Plus): ओकिनावा रिज प्लस इलेक्ट्रिक स्कूटर.67,052 रुपये सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही स्कूटर तिच्या मोटरमधून 0.8 kW (1 bhp) टॉर्क जनरेट करते. तिला इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टीमसह पुढील आणि मागील ड्रम ब्रेक मिळतात. या स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 120 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 2-3 तास लागतात. Okinawa ने Ridge Plus साठी 55 kmph च्या टॉप स्पीडचा दावा केला आहे. 2. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स (Hero Electric Optima CX): हिरो इलेक्ट्रिकने जुलै 2022 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर विक्री चार्टमध्ये अव्वल स्थान मिळविलं. या कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढण्यामागं या स्कूटरचे परवडणारा दर एक महत्त्वाचा घटक आहे. Hero Electric Optima CX 62,355 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही स्कूटर 0.55 kW (0.73 bhp) जनरेट करते. या स्कूटरमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमसह फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेक मिळतात. ही स्कूटर सिटी स्पीड (एचएक्स) आणि कम्फर्ट स्पीड (एलएक्स) या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असून चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.एचएक्स व्हेरियंट ही या स्कूटरची हाय-स्पीड आवृत्ती आहे. तिच्यामध्ये दोन बॅटरी पर्याय आहेत - सिंगल बॅटरी आणि ड्युअल बॅटरी. सिंगल बॅटरी 82 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि ड्युअल बॅटरी एका चार्जवर 122 किमी पर्यंत रेंज देते. स्कूटरचं टॉप स्पीड 45 किमी प्रतितास आहे. हेही वाचा-PM Ujjwala योजनेचं वास्तव आलं समोर, तब्बल 4.3 कोटी लोकांनी एकदाही भरला नाही सिलेंडर 3. बाउन्स इन्फिनिटी E1 (Bounce Infinity E1): या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 55,114 रुपये आहे आणि ती दोन प्रकार आणि 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरची मोटर 1.5 kW (2 bhp) जनरेट करते. स्कूटरच्या पुढच्या आणि मागच्या चाकांना डिस्क ब्रेक आहेत. यात दोन्ही चाकांवर कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम आहे. या स्कूटरचं टॉप स्पीड 65 किमी प्रतितास असल्याचा कंपनीचा दावा आहे. 48V39Ah बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार ते पाच तास घेते आणि एका चार्जवर 85 किमीची रेंज देते. 4. अँपिअर झील (Ampere Zeal): ही इलेक्ट्रिक स्कूटर 67,478 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ती चार रंगांच्या पर्यायांसह फक्त एकाच प्रकारात उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तिच्या मोटरमधून 1.2 kW (1.6 bhp) जनरेट करते आणि तिच्या फ्रटं आणि मागील दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक आहेत. याशिवाय ही स्कूटर 12kW ब्रशलेस DC मोटर 60V/30Ah लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे. ही बॅटरी चार्ट होण्यासाठी सुमारे 5.5 तास लागतात आणि तिची ड्रायव्हिंग रेंज 75 किमी पर्यंत आहे. तिचा टॉप स्पीड 55 किमी प्रतितास असल्याचा कंपनीचा दावा आहे. 5. अँपिअर मॅग्नस प्रो (Ampere Magnus Pro): ही ई-स्कूटर 66,053 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही एका प्रकारात आणि चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. मॅग्नस प्रो 1.2 kW (1.6 bhp) जनरेट करते. तिला दोन्ही चाकांवर कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमसह पुढे आणि मागे ड्रम ब्रेक मिळतात. इलेक्ट्रिक स्कूटर 60V, 30Ah लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे, तिला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे पाच ते सहा तास लागतात. 70-80 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज असल्याचा दावा केला आहे. त्याचा टॉप स्पीड 55 किमी प्रतितास आहे.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Electric vehicles

    पुढील बातम्या