मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

तुमच्या गाडीला धडक मारणाऱ्या गाडीबद्दल माहिती कशी मिळवायची? वाचा सविस्तर

तुमच्या गाडीला धडक मारणाऱ्या गाडीबद्दल माहिती कशी मिळवायची? वाचा सविस्तर

तुमच्या गाडीला कधी अपघात झाला आणि धडक देणारा व्यक्ती गाडी घेऊन पळून गेला किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला इतर कोणत्याही वाहनाची माहिती हवी असेल, तर हे काम अगदी सोपे आहे. वाहनाशी संबंधित सर्व तपशील सरकारच्या VAHAN वेबसाइटला भेट देऊन मिळू शकतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 मार्च : तुम्ही तुमची गाडी पार्किंगमध्ये (Car Parking) लावून कुठेतरी गेलात आणि परत येऊन पाहिलं तर गाडीला कोणीतरी धडक मारल्याचं दिसतं. आता तुम्ही तिथं हजर नव्हता त्यामुळे गाडीला नुकसान कसं झालं? गाडीला धडक मारणारी गाडी कोणती होती, कोणाची होती हे कळणार नाही. अशावेळी तुम्ही तिथं असणाऱ्या लोकांना विचाराल किंवा आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही (CCTV) असतील तर त्याची मदत घेण्याचा प्रयत्न कराल. लोकांना विचारून किंवा सीसीटीव्हीतून तुमची गाडी ठोकणाऱ्या गाडीचा नंबर तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्या वाहनाबद्दल माहिती मिळवू शकता. तुमच्याकडे त्या गाडीचा नंबर असणं आवश्यक आहे. तुमच्याजवळ गाडीचा नंबर असेल तर अपघात (Accident) असो किंवा इतर कोणत्याही कारणाने तुम्हाला एखाद्या गाडीची माहिती हवी असेल तर ती मिळवता येते.

तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर (Registration Number) म्हणजेच गाडीच्या नंबरवरून एखाद्या वाहनाची माहिती काढू शकता. यासाठी एक सरकारी वेबसाईट आहे जी तुम्हाला वाहनाची जवळपास सर्व माहिती देते. त्या वेबसाईटचं नाव वाहन वेबसाईट आहे. भारतातील प्रत्येक वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर एका विशेष क्रमाने येतो आणि तो या वाहनाची ओळख असतो. सरकारी नियमानुसार, वाहन रस्त्यावर चालवण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि ओळखपत्र असणं आवश्यक आहे. वाहन क्रमांक तुमच्या वाहनाच्या कायदेशीर प्रक्रियेत सर्वांत आवश्यक आहे. आता तुम्हाला ज्या वाहनाची माहिती हवी आहे, त्याचा नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. नवीन कार असल्यास ही प्रक्रिया खूप सोपी आहे, परंतु जेव्हा सेकंड हँड कार (second hand car) असेल तर त्याबद्दल सर्व माहिती उपलब्ध असेल याची खात्री नाही. त्यामुळे अशावेळी तुम्हाला स्वतः सर्व कागदपत्रं स्वतः तपासावी लागतात.

Tata ते BMW सर्वच Cars च्या किमती वाढणार, 1 एप्रिलपासून इतकी होणार दरवाढ

दरम्यान, वाहन वेबसाईटवर वाहन चालवण्याचं लायसन्स आणि वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची माहिती लोकांसाठी उपलब्ध आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.

भारतातील कोणत्याही वाहनाची माहिती मिळवण्यासाठी, तुम्हाला वाहन https://vahan.nic.in/ पोर्टलवर जावं लागेल. तुम्हाला पेजच्या टॉपवर असलेल्या know your vehicle details या ऑप्शनवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. यानंतर, तुम्हाला वाहन नोंदणी क्रमांक, चॅसी क्रमांक, इंजिन क्रमांक (engine number), वाहन मालकाचं नाव आणि वाहनाचा क्लास यासारखी इतर माहिती मिळते. येथे वाहनात वापरल्या जाणार्‍या इंधनाचीही माहिती मिळते. याशिवाय रोड टॅक्स, प्रदूषण नियंत्रणासंबंधी (pollution under control) कागदपत्रं आणि वाहन विमा (vehicle insurance) याचीही माहिती उपलब्ध आहे.

तुम्हाला भविष्यात कधी कोणत्याही वाहनाबद्दल कोणत्याही कारणाने माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही वाहन वेबसाईटवर जाऊन वरीलपैकी माहिती मिळवू शकता.

First published:

Tags: RTO, Vehicles