मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

BMW i4 Electric Car: काय सांगता! चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते 'ही' कार, वाचा चकित करणाऱ्या गोष्टी

BMW i4 Electric Car: काय सांगता! चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते 'ही' कार, वाचा चकित करणाऱ्या गोष्टी

BMW i4 Electric Car: काय सांगता! चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते 'ही' कार, वाचा चकित करणाऱ्या गोष्टी

BMW i4 Electric Car: काय सांगता! चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते 'ही' कार, वाचा चकित करणाऱ्या गोष्टी

BMW i4 Electric Car: अलीकडेच बीएमडब्ल्यूने बीएमडब्ल्यू आय-4 (BMW i4) ही नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केलीय. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे फास्ट चार्जरच्या मदतीनं ती केवळ 15 मिनिटांत फुल चार्ज होते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 सप्टेंबर: दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरांत भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रा आणि बीएमडब्ल्यू  आदी कंपन्या एकापाठोपाठ एक इलेक्ट्रिक कार्स (Electric Car) बाजारात आणत आहेत. अलीकडेच बीएमडब्ल्यूने बीएमडब्ल्यू आय-4 (BMW i4) ही नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केलीय. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे फास्ट चार्जरच्या मदतीनं ती केवळ 15 मिनिटांत फुल चार्ज होते.

एकदा चार्ज केल्यानंतर बीएमडब्ल्यूची ही कार 590 किलोमीटर्स अंतर पार करू शकते. ही कार स्पीड आणि मजबुतीच्या बाबतीत पेट्रोल, डिझेल कार्सच्या तुल्यबळ आहे. रस्ते चांगले असल्यास ही कार एकदा चार्ज करून दिल्ली-मनाली हे जवळपास 533 किलोमीटर्सचं अंतर सहज पार करता येऊ शकतं.

कंपनीनं लाँच केलेली दुसरी इलेक्ट्रिक कार-

बीएमडब्ल्यूनं भारतात लाँच केलेली ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. याआधी भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू आयएक्स एसयूव्ही लाँच करण्यात आली होती. ई-ड्राईव्ह 40 आणि एम 50 एक्स ड्राइव्ह या दोन व्हॅरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. त्यात फारसा फरक नाही. दिल्लीतल्या इंडिया आर्ट फेअर (Delhi India Art Fair) प्रदर्शनामध्ये पहिल्यांदा कार सादर करण्यात आली होती.

हेही वाचा:Washing Machine: 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतायेत ‘या’ टॉप वॉशिंग मशिन्स; मिळतीये मोठी सवलत, पाहा लिस्ट

बीएमडब्ल्यू कारची किंमत किती?

बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारात ही नवी कार 69.90 लाख रुपये किमतीसह लाँच केली आहे. ही देशातली पहिली लक्झरी इलेक्ट्रिक सेदान कार आहे. लूक आणि डिझाइनमध्ये कार उत्तम आहे. गाडीच्या पुढील बाजूला मध्यभागी एलईडी हेडलँप देण्यात आला आहे. कारची लांबी 4783 एमएम, तर रुंदी 1852 एमएम इतकी हे. कारची उंची 1000-448 एमएम इतकी आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 2856 एमएमचा व्हीलबेस आहे. ही इलेक्ट्रिक कार असल्याकारणाने मेश ग्रिलच्या जागी बॉडी प्लेट देण्यात आली आहे.

फक्त 5.7 सेकंदांत ताशी 100 ची स्पीड-

बीएमडब्ल्यू कारमध्ये शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. ई-ड्राइव्ह 40 व्हॅरिएंटमध्ये 83.9 KWHची बॅटरी आहे. कारमधली इलेक्ट्रिक मोटर 335 बीएचपीसह सर्वाधिक 430 Nm शक्ती (Power) निर्माण करू शकते. केवळ 5.7 सेकंदांत ही कार शून्यावरून ताशी 100 किलोमीटर हा वेग प्राप्त करू शकते. बॅटरी चार्जिंबद्दल बोलायचं झाल्यास स्मार्टफोनपेक्षाही अधिक वेगाने याचं चार्जिंग होतं. सोलार पॅनेल असल्यामुळे ती सतत चार्ज करण्याची गरज पडत नाही.

दरम्यान, इंधनाचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. केवळ चारचाकीच नव्हे, तर इलेक्ट्रिक दुचाकी घेण्यासाठीही अनेकजण पसंती दाखवत आहेत. इलेक्ट्रिक कारचा प्रवासही आरामदायी ठरू शकतो. शिवाय प्रदूषण टाळण्यासही मदत होऊ शकते.

First published:

Tags: Car, Electric vehicles