मुंबई, 28 जानेवारी : अभिनेत्री सुष्मिता सेन, आपलं आरसपानी सौंदर्य आणि मनमोहक हास्यासाठी प्रसिद्ध आहे. माजी मिस युनिव्हर्स असलेल्या सुष्मिताचे कोट्यवधी चाहते आहेत. तिनं 'आर्या' वेबसीरिजसह अभिनयाच्या क्षेत्रामध्ये पुनरागमन केलं आहे. या शिवाय ती 'ताली' या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. बोल्ड आणि सुंदर असलेली सुष्मिता आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत सोशल मीडियावर अपडेट्स देत असते. आताही तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. लक्झरी एसयूव्ही मर्सिडीज बेंझ GLE 53 AMG या गाडीचा हा फोटो आहे. तिनं ही महागडी गाडी खरेदी केली आहे. 'नवभारत टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सुष्मितानं खरेदी केलेली मर्सिडीज बेंझ GLE 53 AMG काळ्या रंगाची आहे. ही एससूव्ही कार फारच आकर्षक दिसते. कारसोबत स्वतःचा एक फोटो शेअर करत सुष्मिता सेननं लिहिलं आहे की, 'ज्या महिलेला गाडी चालवायला आवडतं तिच्यासाठी, तिनं स्वत:ला एक पॉवरफुल ब्युटी गिफ्ट केली आहे.' हा फोटो पोस्ट करताना तिनं काहीजणांना टॅग करून त्यांचे आभारही मानले आहेत. सुष्मितानं खरेदी केलेल्या गाडीची किंमत 1.93 कोटी रुपये आहे. कूप शैलीतील या एसयूव्हीमध्ये तीन लिटर क्षमतेचं सहा सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन एएमजी स्पीडशिफ्ट 9G TCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देतं. या गाडीची लांबी 4.96 मीटर, रुंदी 2.15 मीटर आणि उंची 1.71 मीटर इतकी आहे. भारतीय बाजारपेठेत 2020 मध्ये ही कार लाँच करण्यात आली होती.
हेही वाचा - Tata Punch : सर्वात स्वस्त अन् दमदार SUV! बघणारे फक्त जळतंच राहतील
मर्सिडीज बेंझ GLE 53 AMG ची फीचर्स
मर्सिडीज बेंझ GLE 53 AMG या गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. गाडीमध्ये 12.3-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि 12.3 इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. या शिवाय, पॅनोरॅमिक सनरूफ, हिटेड आणि व्हेंटिलेटेड सीट्स, चार झोन क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, हेडअप डिस्प्ले, 64 कलर अॅम्बियंट लायटिंग, मल्टिपल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ब्रेक असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट असिस्टसह अनेक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स या कारमध्ये आहेत.
सुष्मिता सेनकडे या कार शिवाय अनेक लक्झरी कार आहेत. यामध्ये बीएमडब्ल्यू X6, ऑडी Q7 आणि Lexus LX470 सारख्या गाड्यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushmita sen wedding, Tech news