मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /पंतप्रधान मोदींकडून नवी Scrap Policy लाँच, टेस्टिंगनंतर कार होणार स्क्रॅप; जाणून घ्या याचे फायदे

पंतप्रधान मोदींकडून नवी Scrap Policy लाँच, टेस्टिंगनंतर कार होणार स्क्रॅप; जाणून घ्या याचे फायदे

जुनी कार स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिलं जाईल. हे प्रमाणपत्र सोबत असणाऱ्या व्यक्तीला नवीन वाहन खरेदी करताना रजिस्ट्रेशनसाठी कसलेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

जुनी कार स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिलं जाईल. हे प्रमाणपत्र सोबत असणाऱ्या व्यक्तीला नवीन वाहन खरेदी करताना रजिस्ट्रेशनसाठी कसलेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

जुनी कार स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिलं जाईल. हे प्रमाणपत्र सोबत असणाऱ्या व्यक्तीला नवीन वाहन खरेदी करताना रजिस्ट्रेशनसाठी कसलेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : जुन्या वाहनांमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाची नवी स्क्रॅपिंग पॉलिसी (Scrappage Policy) जाहीर केली. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून (Video Conferencing) गुजरातमध्ये गुंतवणुकदारांच्या परिषदेत (Investment Summit) सहभागी झाले होते. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी (National Automobile Scrapping Policy) जाहीर केली. या परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील उपस्थित होते.

    पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जुनी वाहनं, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा (Roads Accident) धोका खूप जास्त आहे. मात्र नवीन स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे त्यामधून सुटका होईल. त्याचबरोबर प्रदूषणामुळे (Pollution) आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणामदेखील कमी होईल.'

    'जुन्या तंत्रज्ञानावर आधारित वाहनांच्या क्षमता कमी आहेत, त्यामुळे अनेकदा रस्ते अपघात होतात आणि अनेक सामान्य कुटुंबांना अपघातात आपल्या प्रिय व्यक्तींना गमवावं लागतं. या नव्या पॉलिसीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहनं आणि नियमन यंत्रणा निर्माण होईल, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळेल. तसंच पर्यावरणपूरक असलेल्या या पॉलिसीमुळे प्रदूषण कमी होईल. जुन्या वाहनांचा देखभाल खर्च (Maintenance Cost), दुरुस्ती खर्च (Repair Cost) आणि इंधन कार्यक्षमता (Fuel Efficiency) यामुळे ते वाहन चालवणं खर्चिक होतं, त्यापेक्षा नवी वाहनं अद्ययावत असल्याने हा खर्चदेखील कमी होऊन बचत होईल.’

    पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली कमाल! तयार केली ड्रायव्हरलेस गाडी; फीचर्स वाचाच

    नव्या वाहनाच्या रजिस्ट्रेशनसाठी नका देऊ पैसे -

    जुनी कार स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र (Certificate) दिलं जाईल. हे प्रमाणपत्र सोबत असणाऱ्या व्यक्तीला नवीन वाहन खरेदी करताना रजिस्ट्रेशनसाठी (Registration) कसलेही पैसे द्यावे लागणार नाहीत. तसंच स्क्रॅप पॉलिसीद्वारे रोड टॅक्समध्ये देखील (Road Tax) सूट दिली जाईल.

    Driving License काढणं आता आणखी सोपं; सरकारने आणला नवा नियम

    काही काळानंतर वाहनांमुळे होणारं प्रदूषण वाढल्याने ती चालवणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक होतं. अशा वाहनांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर करत असते. यामुळे प्रदूषण कमी करत पर्यावरणाचं संरक्षण होण्यास मदत होते.

    First published: