मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Free Antivirus आणि VPN वापरणाऱ्यांनी लक्ष द्या; होऊ शकतं मोठं नुकसान

Free Antivirus आणि VPN वापरणाऱ्यांनी लक्ष द्या; होऊ शकतं मोठं नुकसान

त्या क्षणाला आपल्याला ती सेवा/अॅप मोफत मिळालं असलं, तरी त्याची खूप मोठी किंमत नंतर आपल्याला मोजावी लागू शकते.

त्या क्षणाला आपल्याला ती सेवा/अॅप मोफत मिळालं असलं, तरी त्याची खूप मोठी किंमत नंतर आपल्याला मोजावी लागू शकते.

त्या क्षणाला आपल्याला ती सेवा/अॅप मोफत मिळालं असलं, तरी त्याची खूप मोठी किंमत नंतर आपल्याला मोजावी लागू शकते.

मुंबई, 5 ऑगस्ट : आजचं युग तंत्रज्ञानाचं (Technology) आहे, इंटरनेटचं (Internet) आहे आणि सोशल मीडियाचंही आहे. दररोज काही ना काही नवं तंत्रज्ञान बाजारपेठेत येत असतं. त्यामुळे आपल्या जगण्यात खूप मोठी सुधारणा घडून आली आहे; पण सगळंच तंत्रज्ञान चांगल्या उद्देशाने वापरलं जात नाही. वाईट उद्देशाने त्याचा वापर करणारी मंडळीही खूप आहेत आणि तंत्रज्ञानामुळे ते सोपंही झालं आहे. याचाच एक भाग म्हणजे मोफत म्हणून सांगून पुरवल्या जाणाऱ्या सुविधा. फ्री अँटीव्हायरस (Free Antivirus), फ्री क्लाउड स्टोरेज, फ्री मोबाइल क्लीनर, फ्री बॅटरी सेव्हर वगैरे गोष्टी आपल्याला सोशल मीडियात सर्फ करता करता कुठे तरी सहज नजरेस पडतात. उत्सुकतेने आपण त्याबद्दल थोडी अधिक माहिती घेतो. डिस्क्रिप्शन वाचून आपल्याला ती सुविधा घ्यावीशी वाटते आणि आपण ते अॅप किंवा सेवा डाउनलोड करून मोकळेही होतो. कारण ती मोफतच असते; पण त्या क्षणाला आपल्याला ती सेवा/अॅप मोफत मिळालं असलं, तरी त्याची खूप मोठी किंमत नंतर आपल्याला मोजावी लागू शकते. त्यामुळे अशा मोफत सेवा शक्यतो वापरूच नयेच किंवा वापरल्याच तर त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन मगच वापराव्यात. फ्री सेवा वापरण्यात कोणते धोके आहेत, याची माहिती 'आज तक'ने प्रसिद्ध केली आहे.

तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असल्यामुळे अलीकडे जवळपास प्रत्येक गोष्ट आपल्या अंगठ्याच्या एक टॅपवर हजर होते. मग त्या बँकिंग सेवा असोत की घरपोच फूड डिलिव्हरी असो... सगळ्या सुविधा स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. या सुविधांसोबतच सध्या इंटरनेटवर अनेक मालवेअर (Malware) किंवा स्पायवेअरदेखील (Spyware) असतात. मालवेअर म्हणजे अशी अॅप्स, की जी तुम्हाला काही सेवा-सुविधा देण्याचा दावा करतात; मात्र तुमची खासगी माहिती, बँकिंग डिटेल्स, इत्यादी चोरून दुसरीकडे पाठवत राहणं, हा त्यांचा एकमेव उद्देश असतो.

कोणतीही सेवा मोफत दिली जात असेल, तर त्या बदल्यात ग्राहकाकडून काही ना काही तरी घेतलं जात असतंच, याची पक्की खूणगाठ मनाशी बांधावी, मग ती प्रत्यक्षातली सेवा असो किंवा ऑनलाइन. जेव्हा एखादं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर किंवा एखादं अॅप मोफत दिलं जातं, तेव्हा ती कंपनी युझरकडून त्याच्या नकळत डेटा गोळा करत असते. त्यामुळे अशी अॅप्स किंवा सॉफ्टवेअर्सवर विश्वास ठेवणं योग्य नाही. भारतातले बहुतांश अँड्रॉइड युझर्स (Android Users) फ्री सॉफ्टवेअरच वापरतात; पण ते त्यांच्यासाठीच धोकादायक आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

हे ही वाचा-नको असलेल्या WhatsApp ग्रुपमध्ये Add होणं अशाप्रकारे टाळा,करा फक्त ही एक Setting

अशा मोफत अॅप्समध्ये जाहिराती येतात. त्याद्वारे मालवेअर्सही फोनमध्ये येतात. ती हळूहळू फोनमध्ये (Background) आपलं काम करत असतात. त्यांचं काम सुरू आहे, हे आधी लक्षात येत नाही; मात्र नंतर फोन हँग होऊ लागतो. बॅटरीचा वापर जास्त होऊ लागल्याने फोन लवकर डिस्चार्ज होतो आणि फोनमध्ये जोडलेल्या असलेल्या तुमच्या वेगवेगळ्या अकाउंट्सची माहितीही यातून चोरीला जाऊ शकते. फोन हॅक करण्यासाठी हे सगळं केलं जातं.

सिक्युरिटीचे दावे करणारी कोणतीही फ्री अॅप्स वापरण्यापूर्वी ही अॅप्स फोनमधल्या कोणत्या परमिशन्स (Permissions) मागत आहे, हे आधी पाहावं. काही अॅप्स कॉल रेकॉर्डिंग, स्क्रीन रेकॉर्डिंग आदींचीही परमिशन मागत असतात. नव्याने अॅप डाउनलोड केल्यावर सर्वसाधारणतः कोणीही सगळ्या परमिशन्स देऊन टाकतं आणि अॅपची फीचर्स पाहायला घाई करतं; पण ही घाईच संकटात नेते. कारण अनेक अॅप्स आपल्या कामाव्यतिरिक्त अन्य अनेक गोष्टींच्या परमिशन्स युझर्सकडून घेऊन ठेवतात. त्यामुळे युझर्स फोनवरून काय काय करतात, याची सगळी माहिती ट्रॅक केली जाते आणि संबंधित अॅपद्वारे ती त्या अॅपच्या डेव्हलपर्सपर्यंत पोहोचवली जाते.

ही अॅप्स एक प्रकारे सायलेंट किलर असतात. म्हणजेच त्यांच्यामुळे होणारं नुकसान लगेच लक्षात येतंच असं नाही. काही वेळा त्यासाठी काही वर्षंही लागू शकतात. सायबर गुन्हेगार योग्य संधीची वाट पाहत असतात. सध्या आपल्या मोबाइल फोनद्वारे अनेक आर्थिक व्यवहार आणि अन्य प्रकारचेही अनेक महत्त्वाचे व्यवहार आपण करतो. ही माहिती हॅकर्सच्या हाती लागली, तर त्या माहितीचा वापर करून हॅकर्स (Hackers) ब्लॅकमेलिंगही करू शकतात. खात्यातून पैसे चोरू शकतात.

त्यामुळे अँटीव्हायरससारखी सॉफ्टवेअर्स विकत घेऊनच वापरावीत. अगदीच एकट्यासाठी विकत घेणं परवडत नसलं, तर फॅमिली पॅकेजही घेणं शक्य असतं. म्हणजेच एकच सॉफ्टवेअर कुटुंबातल्या सर्वांना वापरता येतं. ते आर्थिकदृष्ट्याही परवडतं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चांगलं असतं.

First published:

Tags: Mobile, Mobile app