मुंबई 27 डिसेंबर : जगभरात नुकताच नाताळ सण उत्साहात साजरा झाला. नाताळनंतर आता प्रत्येक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. 2022 हे वर्ष संपण्यास आता जेमतेम चार दिवस राहिले आहेत. नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयारीला लागला आहे. नवीन वर्षानिमित्त आपण खास मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटवस्तू देत असतो. त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण आपल्यासाठी खास वस्तू खरेदी करतो. नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सध्या विविध वस्तूंनी बाजार फुलून गेला आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरदेखील डिस्काउंट, ऑफर सुरू आहेत. अशा स्थितीत नेमकी कोणती वस्तू खरेदी करावी, असा संभ्रम मनात निर्माण होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही उपयुक्त, खास आणि तुलनेनं कमी किंमत असलेल्या वस्तुंविषयी सांगणार आहोत.
नाताळनंतर आता सर्वांनाच आशादायी आणि आनंददायी नवीन वर्षाची प्रतीक्षा आहे. जर तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने कुटुंबीय, मित्र किंवा आपल्यासाठी खास भेटवस्तू शोधत असाल तर आम्ही तुम्हाला खास गॅजेट्स आणि स्मार्ट डिव्हाइसेसची माहिती देत आहोत. या सर्व वस्तू अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.
अॅमेझॉन बेसिक्स मॅग्नेटिक वायरलेस चार्जर ही एक तुमच्यासाठी खास भेटवस्तू ठरू शकते. अॅमेझॉन बेसिक वायरलेस चार्जरची किंमत 1249 रुपये आहे. हे डिव्हाइस iPhone 13/13 Pro/13 Mini/13, ProMax/12/11,Samsung Galaxy S21/S20/Note 10/Edge Note 20 Ultra/S10, Airpods Pro ला कनेक्ट करता येते.
होममेट वाय-फाय मल्टिकलर स्मार्ट एलईडी स्ट्रिप किट अॅमेझॉनवर 1999 रुपयांना उपलब्ध आहे. ही स्ट्रिप 5 मीटर लांब आहे. अॅमेझॉन इको डिव्हाइस आणि गुगल असिस्टंटवर ही स्ट्रिप चालते.
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स सोलस व्हिडिओ डोअर फोन 6899 रुपयांत उपलब्ध आहे. गोदरेज व्हिडिओ डोअर फोनमध्ये 7 इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे. हा फोन एक मोठा एरिया कव्हर करतो. यात नाइट व्हिजनसाठी एलईडी असल्याने तुम्ही रात्रीदेखील याचा वापर करू शकता. यात डोअरबेल कलर, ब्राइटनेस, डिस्प्ले कॉन्ट्रास्ट आणि रिंगटोन व्हॉल्यूम अॅडजेस्ट करता येतो.
अॅपल आयफोन 14 अॅमेझॉनवर 77,490 रुपयांत उपलब्ध आहे. अॅपल आयफोन 14 मध्ये 2532x1170 पिक्सेल रिझॉल्युशनचा 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यात Apple A 15 बायोनिक चिपसेट आहे. हा आयफोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये मिळतो. मिडनाइट, पर्पल, स्टारलाइट, प्रॉडक्ट रेड आणि ब्लू स्मार्टफोन या कलर्समध्ये हा आयफोन उपलब्ध आहे.
नथिंग फोन (1) हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 27,999 रुपयांत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778+ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. यात 6.55 इंचाचा फुल HD+OLED डिस्प्ले असून त्याचा अॅडप्टिव्ह रिफ्रेश रेट 60Hz ते 120 Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा फ्लॅगशिप सोनी आयएमएक्स 766 आहे.
गुगल पिक्सेल वॉचची प्रारंभिक किंमत 35,100 रुपये आहे. गुगल पिक्सेल वॉच एका सर्क्युलर डॉम्ड डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. यात गुगल Wear OS आहे. या स्मार्टवॉचमध्ये स्क्रॅच प्रोटेक्शन कॉर्निंग (आर) गोरिल्ला (आर) ग्लास देण्यात आली आहे. हे वॉच 5एटीएम (50 मीटर) पर्यंत वॉटर रेसिस्टंटचा सामना करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब S6 लाईट अॅमेझॉनवर 37,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. या टॅबमध्ये 12.4 इंच आणि 2560 X 1600 पिक्सेल WQXGA डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 700 सीरिज असून तो अॅण्ड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर रन होतो. डिव्हाइसमध्ये 45 वॅट सुपर फास्ट चार्जिंगसह 10,090 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंटला 5MP कॅमेरा देण्यात आला आहे.
वनप्लस बड्स Z2 सध्या अॅमेझॉनवर 4999 रुपयांत उपलब्ध आहे. वनप्लस बड्स झेड 2 मध्ये फेंट (+/-25dB) आणि एक्सट्रीम (+/-40 dB) हे दोन मोड्स आहेत. तसेच यात वनप्लस मोबाईल किंवा हेमेलोडी अॅपच्या माध्यमातून मॅन्युअल अॅडजेस्टमेंटमधून 40dB नॉईज केन्सिल करण्यासाठी खास सुविधा देण्यात आली आहे. यात 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स असून IP55 वॉटर आणि स्वेट रेसिस्टंट डिझाइन आहे.
अॅपल वॉच सीरिज एसई अॅमेझॉनवर 30,900 रुपयांच्या डिस्काउंड किंमतीत उपलब्ध आहे. अॅपल वॉच सीरिज एसईच्या मदतीनं युजर्सला थेट हातावरून कॉल किंवा टेक्स्ट मेसेज करता येतो. यात आपत्कालीन एसओएस, फॉल डिटेक्ट, अनियमित हार्ट ऱ्हिदम नोटिफिकेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
boAt Stone 1450 पोर्टेबल वायरलेस स्पीकर अॅमेझॉनवर 3999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात 40 वॅट आरएमएस सिग्नेचर साउंड आहेत. हा TWS फंक्शनॅलिटीला सपोर्ट करतो. याचाच अर्थ तुम्ही दोन स्टोन 1450 एकावेळी याला कनेक्ट करू शकता आणि दोन्हींवर एकावेळी दोन वेळा इम्पॅक्ट येण्यासाठी संगीत लावू शकता. एकूणच यापैकी कोणतंही गॅजेट किंवा डिव्हाइस हे तुमच्यासाठी नवीन वर्षाची खास भेटवस्तू ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online shopping, Tech news, Technology, Viral