मुंबई, 14 सप्टेंबर: मारुती सुझुकी सप्टेंबरच्या अखेरीस ग्रँड विटारा लॉन्च करणार आहे. पण लाँचपूर्वीच ही गाडी भारतीय कार बाजारात सुपरहिट ठरल्याचं दिसत आहे. ग्राहकांमध्ये या गाडीच्या बाबतीत प्रचंड उत्सुकता असून बाजारात तिची मागणी प्रचंड आहे. या एसयूव्हीविषयी माहिती देताना मारुतीनं सांगितलं की, या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी आतापर्यंत तब्बल 53,000 बुकिंग मिळाली आहेत. या बुकिंगमध्ये 23000 बुकिंग स्ट्राँग हायब्रिड व्हेरियंटसाठी आहेत. 5 पैकी 2 खरेदीदार ग्रँड विटाराच्या स्ट्राँग हायब्रिड प्रकाराची निवड करत आहेत. ग्रँड विटारा मारुती सुझुकीच्या नेक्सा लाइन-अपमधील एस-क्रॉसची जागा घेईल. ग्रँड विटाराचे बुकिंग 11,000 रुपये टोकन रक्कम भरून करता येते. विभागातील सर्वाधिक मायलेजचा दावा: मारुतीने ग्रँड विटाराची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि तिची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये असू शकते. मारुती सुझुकीनं दावा केला आहे की ही कार तिच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 27.97 kmpl चा मायलेज देईल. हेही वाचा: Maruti Suzuki Celerio: ‘या’ कारनं तोडले सर्व रेकॉर्ड! मागणीमध्ये एका वर्षात तब्बल 1094 टक्क्यांची वाढ ग्रँड विटाराची वैशिष्ट्ये: मारुती सुझुकी ग्रँड विटारा मध्ये पॅनोरामिक सनरूफ, हेड्स-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अॅम्बियंट लाइटिंग, फ्रंट व्हेंटीलेशन सीट्स, कीलेस एंट्री, रेअर एसी व्हेंट्स, इंजिन स्टार्ट/स्टॉप करण्यासाठी एक पुश बटण यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. यूएसबी पोर्ट, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट देण्यात आला आहे.
ग्रँड विटारा इंजिन: मारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे हायरायडर आणि ग्रँड विटारा विकसित केली आहेत. हायरायडरप्रमाणे ग्रँड विटारामध्ये माइल्ड-हायब्रीड पॉवरट्रेन दिलं आहे. 1462cc K15चं हे इंजिन 6,000 RPM वर सुमारे 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. याला माइल्ड हायब्रिड सिस्टीम मिळते आणि ती 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडली जाते. ही पॉवरट्रेन आजपर्यंत AWD पर्याय असलेलं एकमेव इंजिन आहे.