नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांत चारचाकी त्यातही कार
(Car) खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कुटुंबासोबत छोट्या ट्रिपचा आनंद घेणं असो अथवा ऑफिसच्या कामानिमित्त दौरा, स्वतःची कार निश्चितच उपयोगी पडते. देशात टाटा, ह्युंदाई आणि मारुती या प्रमुख कार उत्पादक कंपन्या आहेत. लोकं आपली आवड आणि गरजेनुसार कारचं मॉडेल निवडताना दिसतात. जुलै महिन्यातील टॉप -10 कार मॉडेल्सचा विचार करता, मारुती कंपनीचा
(Maruti Company) दबदबा कायम असल्याचं दिसून आलं. कार मॉडेल्सच्या या यादीवर नजर टाकता, मारुतीची एक कार लक्ष वेधून घेणारी ठरली. या यादीत 9 व्या स्थानावर असलेल्या मारुतीच्या मायक्रो
SUV एस-प्रेसोला
(S-Presso) ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी राहिली. जुलै महिन्यात या कारला सर्वाधिक 65 टक्के ग्रोथ मिळाली. या कारची प्रारंभिक एक्स -शोरुम किंमत 4.25 लाख रुपये आहे. ही कार ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचं एकूण आकडेवारीवरून दिसून येतं. `लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`ने या विषयी वृत्त दिलं आहे.
जुलै महिन्यात बाजारामध्ये मारुती कंपनीचा दबदबा कायम असल्याचं दिसून आलं. या वेळी कार मॉडेल्सच्या टॉप -10 यादीत मारुती कंपनीची सात नव्हे तर सहा मॉडेल समाविष्ट होती. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लोकांची प्रथम पसंती असलेली मारुती वॅगनआरने
(Maruti Wagon R) या यादीत अव्वल स्थान कायम ठेवलं. टॉप -3 मध्ये बलेनो, स्विफ्ट या कारचा समावेश नसल्याचं दिसून आलं. या यादीत टाटाची नेक्सन आणि पंच तसंच ह्युंदाईची क्रेटा आणि वेन्यू या कारचा समावेश आहे. या यादीत 9 व्या स्थानावर असलेल्या मारुतीच्या मायक्रो SUV एस-प्रेसो या कारला विशेष मागणी राहिली.
मारुतीच्या या मायक्रो SUV चा मार्केटमध्ये दबदबा वेगानं वाढतोय. ही कार दिसायला लहान असली तरी आतून स्पेशियस आहे. कमी जागेतही ही कार आरामशीर पार्क करता येतो. कारमध्ये बूट स्पेसही (Boot Space) चांगली आहे. कुटुंबातले पाच सदस्य या कारमध्ये आरामशीर बसून प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. उत्तम फीचर्स असल्याने तरुणाईकडून या कारला मागणी वाढत आहे. मारुती कंपनीने मायक्रो SUV म्हणजेच एस-प्रेसोचं नवं मॉडेल (2022) लाँच केलं आहे. या मॉडेलमध्ये नेक्स्ट जनरेशन k-सीरिज, 1.0 लिटर ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन आहे. या कारमध्ये आयडियल स्टार्ट-स्टॉप टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या कारची इंधन कार्यक्षमता सध्याच्या अन्य मॉडेलपेक्षा जास्त झाली असल्याची कंपनीचं म्हणणं आहे. नवीन एस-प्रेसोच्या Vxi(O) आणि Vxi+(O) AGS व्हेरियंट 25.30 Km/L, Vxi/Vxi+MT 24.76 Km/L आणि Std/Lxi MT 24.12 Km/L इतकं मायलेज देतील. तसेच नव्या मॉडेल्या सर्व AGS व्हेरियंटमध्ये ESP सोबत हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल ORVMs ही सुविधा मिळेल.
उबरची नवीन सुविधा; आता व्हॉट्सअॅपवरही बुक करता येणार कॅब, ऑटो आणि बाइक राइड
एस-प्रेसो 2022 मध्ये वाहनचालकाच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी काळजी घेण्यात आली आहे. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ABS सोबत EBD,प्री-टेन्शन अँड फोर्स लिमिटर फ्रंट सीट बेल्टसोबत फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हायस्पीड अलर्ट सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टेब्लिटी प्रोग्रामसह हिल होल्ड असिस्टसारखे फीचर्स (Features) देण्यात आले आहेत. ग्राहकांसाठी ही कार वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायासह उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
याशिवाय नवीन एस-प्रेसोमध्ये नेक्स्ट जनरेशन K-Series 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन आहे. हे इंजिन 49kw@5500 rpm ची पॉवर आणि 89Nm@3500rpmचं पीक टॉर्क (Peak Torque) जनरेट करते. या इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5- स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनची जोड देण्यात आली आहे. नवीन एस-प्रेसोमध्ये तरूणपणा, चैतन्य आणि ऊर्जा आहे. तसेच ही कार भारताच्या गो-गेटर्सला साद घालते. या कारमध्ये कमांडिंग ड्राईव्ह व्ह्यू, डायनॅमिक सेंटर कन्सोल, उत्तम केबिन स्पेस आणि हाय ग्राउंड क्लिअरन्स तसेच बोल्ड एसयूव्हीसारखं एक्सटीरिय देण्यात आलं आहे. यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुखद आणि आनंददायी होते.
मागील महिन्यात मारुती कंपनीने 11,268 एस-प्रेसोची विक्री केली. या कारला वार्षिक 65 टक्क्यांची ग्रोथ मिळाली आहे. जुलै 2021 मध्ये या कारच्या 6818 युनिटची (Unit) विक्री झाली होती. मागील महिन्यात कंपनीने 4450 पेक्षा अधिक एस-प्रेसोंची विक्री केली आहे. त्यामुळे कार खरेदीचं नियोजन करत असाल तर मारुतीची एस-प्रेसो ही कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. माहिती घ्या आणि नक्की विचार करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.