जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Maruti Jimny: महिंद्रा थारला मारूती देणार टक्कर, नवी SUV लवकरच होणार लाँच; किंमतही बजेटमध्ये

Maruti Jimny: महिंद्रा थारला मारूती देणार टक्कर, नवी SUV लवकरच होणार लाँच; किंमतही बजेटमध्ये

महिंद्रा थारला मारूती देणार टक्कर, नवी SUV लवकरच होणार लाँच; किंमतही बजेटमध्ये

महिंद्रा थारला मारूती देणार टक्कर, नवी SUV लवकरच होणार लाँच; किंमतही बजेटमध्ये

Maruti Jimny: मारुती सुझुकीच्या मोस्ट अवेटेड जिम्नी SUV ची प्रतीक्षा 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये संपणार आहे. कोरोनामुळं तिचं लाँचिंग लांबणीवर पडलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर: मारुती सुझुकीच्या मोस्ट अवेटेड जिम्नी (Maruti Jimny) SUV ची प्रतीक्षा 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये संपणार आहे. कंपनीनं 2020 ऑटो एक्स्पोमध्ये ती सादर केली होती. त्यानंतर, कोविड-19 मुळे, तिचं लाँचिंग लांबणीवर पडलं. तथापि, गेल्या 6-7 महिन्यांत, भारतीय रस्त्यांवरील चाचणी दरम्यान ती वारंवार दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे भारतात लॉन्च होणारं हे 5-दरवाज्याचं मॉडेल असेल. ही ऑफ रोड एसयूव्ही महिंद्रा थारपेक्षा लांब असेल. तथापि महिंद्रानंदेखील आपल्या थारच्या 5-दार मॉडेलची चाचणी देखील सुरू केली आहे. मारूती जिम्नीच्या एक्स्टेरियरप्रमाणेच इंटेरियरदेखील आलिशान आहे. भारतीय बाजारपेठेत तिची थेट स्पर्धा महिंद्रा थारशी होईल. मारूती जिम्नीच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10 लाखांपेक्षा कमी असू शकते, असं मानलं जात आहे. मारुती सुझुकी जिम्नीचं इंटीरियर- जिम्नीमध्ये कोणतंही मोठे बदल अपेक्षित नाहीत, परंतु जागा वाढवली जाऊ शकते. उदाहरणार्थ, दुसऱ्या रोसाठी अधिक बूट जागा उपलब्ध असू शकते. त्याच वेळी, डॅशबोर्डवरील 7-इंच टचस्क्रीनऐवजी, एक मोठी 9-इंच टचस्क्रीन दिसू शकते. जिमनीच्या भारतीय मॉडेलचे इंटीरियर युरोपीयन बाजाराच्या तुलनेत वेगळे असेल. मात्र, आतापर्यंत त्याच्या इंटेरिअरबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. ऑटोमॅटिक एसी, मल्टी स्पीकर, 360 डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये मिळू शकतात. कंपनी कदाचित यामध्ये सनरूफचा पर्याय देणार नाही. हेही वाचा-  Maruti Suzuki Celerio: ‘या’ कारनं तोडले सर्व रेकॉर्ड! मागणीमध्ये एका वर्षात तब्बल 1094 टक्क्यांची वाढ मारुती सुझुकी जिमनी इंजिन- ही ऑफ-रोड कार 1.5-लिटर, 4-सिलेंडर K15B पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल जी 6,000rpm वर 101bhp ची कमाल पॉवर आणि 4,000rpm वर 130Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन नवीन Brezza, Ertiga आणि Ciaz मध्ये देखील आहे. वाहनाला 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड ऑटोमॅटिकचा पर्याय मिळेल. ऑफ-रोड एसयूव्ही लॅडर फ्रेम चेसिसला अंडरपिन करेल आणि सुझुकीच्या ऑलग्रिप प्रो 4 व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान, 3-लिंक रिजिड एक्सल सस्पेंशन आणि लो रेंज ट्रान्सफर गियरसह येईल.

News18लोकमत
News18लोकमत

सुझुकी जिमनी रेटिंग 5 पैकी फक्त 3 स्टार- जागतिक बाजारपेठेत आधीच अस्तित्वात असलेल्या मारुती सुझुकी जिम्नीला क्रॅश टेस्टमध्ये 5 पैकी फक्त 3 स्टार मिळाले आहेत. ऑफरोडिंगसाठी बनवण्यात आलेली ही एसयूव्ही सुरक्षिततेच्या दृष्टीनं खूपच मजबूत असावी. सेफ्टी असिस्टच्या बाबतीत हे फक्त 50 टक्के सुरक्षित आहे. यात 15-इंच आणि 16-इंच टायरचे पर्याय आहेत, जे 5-स्पोक अलॉय व्हीलसह येतात. तथापि, नवीन मॉडेलमध्ये अनेक सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे, तिचे रेटिंग सुधारू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात