जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / महिंद्रा लाँच करणार परवडणारी थार; जाणून घ्या किती असेल किंमत

महिंद्रा लाँच करणार परवडणारी थार; जाणून घ्या किती असेल किंमत

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

दमदार इंजिन, मजबूत आणि खास स्टाइल आणि रॉयल लूकमुळे ही एसयूव्ही तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे; पण तिच्या किमतीमुळे ही एसयूव्ही अनेकांच्या बजेटबाहेर असते. म्हणून…

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 डिसेंबर : महिंद्रा थार ही लोकप्रिय एसयूव्ही आहे. या गाडीला ऑफ रोडसाठी विशेष पसंती दिली जाते. अनेकांची ही स्वप्नातली गाडी आहे. महिंद्रा थार म्हटलं, की एक शक्तिशाली ऑफ रोड कार आपल्या नजरेसमोर येते. दमदार इंजिन, मजबूत आणि खास स्टाइल आणि रॉयल लूकमुळे ही एसयूव्ही तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे; पण तिच्या किमतीमुळे ही एसयूव्ही अनेकांच्या बजेटबाहेर असते. पण थारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच या गाडीचं एक स्वस्त व्हर्जन बाजारात येणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा लवकरच कमी किमतीत महिंद्रा थार लाँच करणार आहे. तसंच थारच्या या व्हर्जनमध्ये अनेक बदलही पाहायला मिळतील. या संदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा थार लवकरच नवीन 1.5-लिटर डिझेल इंजिनचं व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ती सध्याच्या 2.2-लिटर (डिझेल) आणि 2.0-लिटर (पेट्रोल) इंजिनसह विकली जाईल. या नवीन इंजिनमुळे SUV देखील नवीन टॅक्स ब्रॅकेटमध्ये सहजपणे फिट होईल. कारण ती आधीपासूनच अंडर फोर मीटर सेगमेंटमध्ये येते. या SUV ची लांबी फक्त 3,985 mm आहे. या एंट्री-लेव्हल व्हॅरिएंटमध्ये, कंपनी 1.5-लिटर डिझेल इंजिन वापरू शकते, जे 117hp पॉवर जनरेट करते. हेच इंजिन कंपनीने मराझोमध्येही वापरलं होतं. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. त्यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन समाविष्ट नसेल. त्यामुळे या व्हॅरिएंटची किंमत कमीत कमी ठेवण्यास मदत होईल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    महिंद्राच्या या स्वस्त व्हॅरिएंटमध्ये आणखी एक मोठा बदल ड्रायव्हिंग सिस्टीममध्येही पाहायला मिळेल. ती टू-व्हील ड्राइव्ह (2WD) सिस्टीमसह येईल असं म्हटलं जातंय. सध्याचं डिझेल मॉडेल फोर व्हील ड्राइव्ह (4WD) सिस्टीमसह येतं. त्यामुळे एसयूव्हीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. या एंट्री-लेव्हल महिंद्रा थारच्या इंटीरियरचा एक फोटो इंटरनेटवर लीक झाला आहे. त्यात गियर लीव्हरऐवजी सेंट्रल कन्सोल बसवल्याचं दिसत आहे. हे वाचा -  मुंबई ते कोल्हापूर अवघ्या एका तासात, ‘या’ इलेक्ट्रिक कारचा नादच खुळा डिझेल इंजिनव्यतिरिक्त, कंपनी आताचं 2.0L टर्बो-पेट्रोल व्हॅरियंटदेखील टू-व्हील ड्राइव्ह (2WD) सिस्टिमसह लाँच करील. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सचाही समावेश असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन कमी किमतीतली महिंद्रा थार पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच करू शकते. लाँच होण्यापूर्वी तिच्या किमतीबद्दल काहीही सांगणं कठीण आहे; पण तज्ज्ञांच्या मते नवीन थार सध्याच्या मॉडेलपेक्षा खूपच स्वस्त असेल. सध्याच्या मॉडेलची किंमत 13.59 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. टू-व्हील ड्राईव्ह आणि छोटं इंजिन वापरल्यामुळे कंपनीला एक्साइजचाही फायदा होईल. त्यामुळे तिची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत असू शकेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: auto expo , car
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात